पिक अनुदानासाठी शेतक-यांचे अामरण उपोषण लेखी आश्वासनाने मागे 

0
27
बिलोली (सय्यद रियाज),दि.04ः- खरिप  हंगाम सन २०१६ मध्ये अतिवृष्टि व अवेळी पाउस यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्यामुळे तालुक्यातील पिक विमा वंचित  लाभार्थी शेतक-यांना शासकिय  अनुदानापोटी अठरा  कोटी आठ लाख रुपयाचा निधी प्राप्त होऊनही तो निधी शेतक-यांना देण्यात येत नसल्याने महात्मा गांधी जयंती दिनी तहसिल  कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता.त्यानंतरही तालुका प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे बाधित शेतकर्याना गांधी जयंती दिनी उपोषण करण्याची वेळ आली.
या उपोषण आंदोलनास स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष हाणमंतराव वाडेकर , म.न.से किसान जिल्हाध्यक्ष गणेश पा.डोणगावकर,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष बालाजी पा.शिंदे ,अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन जिल्हाध्यक्ष बालासाहेब कदम,सिमावर्ती समन्वयक प्रमुख  गोंविद मुंडकर , तालुका  काँग्रेस पक्षाच्या वतिने तालुका अध्यक्ष शिवाजी पाटिल पाचपिपळीकर ,शिवसेना तालुका प्रमुख बाबाराव रोकडे ,म.न.से.ता.प्र.शंकर महाजन ,छावा ता.अध्यक्ष साहेबराव शिंदे ,आ.भा.विरशैव शिवा संघटना तालुका अध्यक्ष महेश पा.हांडे , मनोहर  वसमते व राष्ट्रवादी शहर प्रमुख मुन्ना पोवाडे याच्यासह अनेक राजकिय पक्ष व संघटनानी पांठिबा दिला.तर उपोषणकर्त्याची मा.खा.भास्करराव पाटिल खतगावकर, आ.राम पाटिल रातोळीकर जि.प.सदस्य लक्ष्मनराव ठक्करवाड मा.जि.प.सदस्य बालाजी बच्चेवार यानी भेट देउन बाजू एैकूण घेतली आणि झालेल्या विलबंबाबत  उपस्थित नायब तहसिलदार निलावाड यांच्याशी चर्चा करुन अनुदान लाभार्थींच्या खात्यावर 8 तारखेच्या आत जमा करण्याच्या सुचना दिल्या.अनुदान लाभार्थी शेतक-यां च्या बँक खात्यावर जमा करण्याचे लेखी हमी पञ घेऊन  मान्यवर खतगावकर व आ.रातोळीकर यांच्या  मध्यस्थीने  उपोषण  मागे घेण्यात आले.तहसिलदार व उपोषणकर्त्यात समन्वय साधन्याची महत्त्वपुर्ण भुमिका जेष्ठ पञकार गोविंद मुंडकर ,पो.नि.भगवान धबडगे ,भाजप तालुका अध्यक्ष आनंद बिराजदार यानी घडवुन आणली. सदर उपोषणकर्त्यामध्ये  राजु पाटिल शिंपाळकर ,मोहन पा.जाधव बडुरकर ,वसंतराव जाधव,बाबुराव गोसलोड  लघुळ ,नागनाथ गोजे सावळीकर ,आनंदराव पाटिल कोळगाव ,गजानन शेळके कार्ला खु,बालाजी संभाजी हिवराळे यांचा समावेश होता.यास पांठिबा म्हणून प.स.सभापती प्रतिनिधी गंगाधर अनपलवार ,गंंगाधर प्रचंड प.स.सदस्य शंकर व्यंकम ,मा.उपसभापती उमाकांत गोपछडे , सरपंच राजेंद्र पा.कार्लेकर ,गंगाधर नरवाडे,डाँ.खाकय्याप्पा कासराळीकर, बाळु पा.केसराळीकर, हाणमंतराव कनशेटे ,शिवाजी शिंदे कासराळीकर,व्यंकटराव गुजरीकर , यांच्यासह   शेतकरीवर्ग व  राजकिय सामाजिक  क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने  उपस्थिती होती.