जीएडी डेप्युटी सीईओचा प्रताप,परिचराला दिला कनिष्ठ सहाय्यकाचा पदभार

0
29

गोंदिया,(खेमेंद्र कटरे) दि.०४ः-गोंदिया जिल्हा परिषद ही आएसओ प्रमाणपत्र मिळालेली जिल्हा परिषद आहे.त्यातच विद्यमान मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी हे सुध्दा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कारभारात कुठलाच गैरप्रकार व चुकीचे होणार नाही याची तसदी घेत असताना चक्क सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांनी ३ ऑक्टोंबर २०१८ रोजी काढलेल्या पत्रात कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदाचा पदभारच परिचराकडे सोपविल्याचे पत्रच बेरार टाईम्सच्या हाती लागल्याने प्रशासकीय कामकाजाची पोलखोल झाली आहे.
सविस्तर असे की सामान्य प्रशासन विभागातील कार्यरत कनिष्ठ सहाय्यक(लेखा)यु.एच.पळसकर यांची प्रशासकीय बदली आमगाव पंचायत समिती येथे झाली.त्या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी ३ ऑक्टोंबर २०१८ रोजी पळसकरला दुपारनंतर कार्यमुक्त करण्यात आले.कार्यमुक्त करतांना त्याच्याकडे असलेला पदभार हा समकक्ष कर्मचाèयाकडे सोपविण्यात येतो.मात्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी वाळके यांनी त्याला फाटा देत सामान्य प्रशासन विभागातील परिचराकडे कार्यासन क्रमांक ११ व १५ चा संपूर्ण कार्यभार पुढील आदेशापर्यंत देण्यात येत असल्याचे आदेशच जारी केल्याने जिल्हा परिषदेच्या कर्मचारी वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.त्या पत्राची प्रतिलिपी मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा वित्त अधिकारी यांना सुध्दा दिली गेली आहे.