अर्जुनी मोरगाव तालुक्यात 16 गावात जलयुक्तची होणार कामे

0
19

अर्जुनी मोरगाव,दि.05ः- येथील अर्जुनी/मोर. पंचायत समितीच्या सभागृहात सभापती अरविंद शिवनकर यांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार योजना २०१८-१९ करिता अर्जुनी/मोर.तालुक्यातील १६ गावांची निवड करुन आराखडा सादरीकरणासंदर्भात(दि.4) बैठक घेण्यात आली.गावातील कामांचा आराखडा सुव्यवस्थित होण्याच्या दृष्टीकोनातून संबंधीत ग्रामपंचायत सरपंच,ग्रामसेवक व सदर योजनेच्या कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारीसह पं.स.उपसभापती करूणाताई नांदगावे,पं.स.सदस्य रामलाल मुंगणकर,तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम,सहा.खंड विकास अधिकारी मयुर आंदेलवाड, लपाजिप चे उपविभागीय जलसंधारण अधिकारी सुभाष घरतकर, मग्रारोहयो पं.स.चे सहा.कार्यक्रम अधिकारी एन.रामटेके, मं.कृ.अ.एन.एच.मुनेश्वर,संजय रामटेके उपस्थित होते.यांच्यासह अर्जुनी/मोर.,नवेगांव बांध,गोठणगांव वनपरिक्षेत्राचे क्षेत्रसहायक,लपाजिपचे सर्व शाखाअभियंता,कनिष्ठ अभियंता,ता.कृ.अ.कार्यालयाचे सर्व कृषी पर्यवेक्षक,कृषी सहायक,जलसंधारण विभाग देवरीचे कनिष्ठ अभियंता खोकले इत्यादि उपस्थित होते.सर्व पदाधिकारी व अधिकारी,कर्मचारी यांच्या समन्वयातून गावांच्या परिस्थितीनुरूप कामांचा सुयोग्य असा आराखडा तयार करण्यात आला.अंदाजे २७७ कामे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत यावर्षी अर्जुनी/मोर.तालुक्यातील १६ गावांमध्ये करण्यात येणार आहेत.