तलाठी पांडे लाचघेताना जाळ्यात

0
12
संदीप पांडे याने तक्रारदार यांच्याकडे शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकामाचा सहा हजार रुपयांचा धनादेश मिळवून देण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली होती. त्यात तडजोड करुन पंधराशे रुपयाची लाच घेण्यास आरोपी संदीप पांडे तयार झाला. दरम्यान या प्रकरणी तक्रारदाराने यवतमाळ येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आसोला या गावी सापळा रचला. त्यात या पथकाने संदीप पांडे यास तक्रारदार यांच्याकडून दीड हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक आर. बी. मुळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली पोलिस निरीक्षक अस्मिता नगराळे, यांसह कर्मचारी सुरेंद्र जगदाळे, अनिल राजकुमार निलेश पखाले, किरण खेडकर, वसीम शेख, महेश वाकोडे, सचिन भोयर आणि राकेश साबसाकडे यांच्या पथकाने केली.