शरद पवारांनी लोकसभा निवडणूक न लढण्याची केली घोषणा

0
14

मुंबई,दि.06(विशेष प्रतिनिधी)ः- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. शरद पवार यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये याबाबत जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या लोकसभा लढवण्याबाबतच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान,  पुणे लोकसभा मतदार संघातून पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी धरला होता, तसे सूतोवाचही राष्ट्रवादीचे  प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केले  होते.  येत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊ घातली असली, तरी राष्ट्रवादीने पुणे, औरंगाबाद आणि हतकणंगले या मतदार संघांसह राज्यातील २५ जागांवर दावा सांगितला आहे. परभणी आणि अमरावती या जागांची अदलाबदल करावी, अशी आमची मागणी असल्याचे काकडे यांनी सांगितले. पुणे लोकसभा मतदारसंघ गेली अनेक वर्षे काँग्रेसकडे आहे. मात्र मागच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार पराभूत झाला. येत्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी पुण्यातून लढावे, असा आग्रह पक्षातून धरला जात आहे. यावर पवारांची प्रतिक्रिया समजू शकलेली नाही. मात्र, ऐनवेळी ते होकार देतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलून दाखविला.