पशुसंवर्धनमंत्र्यांनी दिली गोंदिया जिल्हा दुग्ध संघाला स्थगीती

0
25

गोंदिया,दि.०6-सरकारने ठरवून दिलेल्या हमी भावापेक्षा पाच रुपयांनी कमी दराने दूध खरेदी करणाèया गोंदिया जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ सहा वर्षासाठी बरखास्त करण्याच्या सहकारी संस्था (दुग्ध) नागपूरचे विभागीय उपनिबंधक एस. एन. क्षीरसागर यांच्या आदेशाला सहनिबंधक दुग्ध मुंबई यांनी कायम ठेवत 27 सप्टेंबरला प्रशासक नियुक्त केले होते.त्या 27 सप्टेंबरच्या निर्णयाविरोधात गोंदिया जिल्हा दुग्ध संघाच्या संचालक मंडळाने राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री यांच्याकडे स्थगिती मिळविण्यासाठी दाखल केलेल्या अर्जाची दखल घेत आज 6 आक्टोंबरला पशुसंवर्धन मंत्र्यांनी दुग्ध संचालकांच्या अर्जाला स्थगिती दिली आहे.सहनिबंधकांच्या पत्रावर स्थगिती मिळाल्याने दुग्धसंघावर नेमलेला प्रशासक सुध्दा पुढील सुनवाईपर्यंत पदावरून दूर झाले आहेत.स्थगितीवरील सुनावणीहोईपर्यंत जिल्हा दुग्ध संघाचे विद्यमान संचालक मंडळच कार्यरत राहील असे लेखी आदेश  पशुसंवर्धन विभागाचे कक्ष अधिकारी स्व.अ.चव्हाण यांनी 6 आक्टोंबरला दिले आहेत.त्यातच सुनावणीची वेळ व तारीख नंतर कळविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.र्षांपासाठी अपात्र ठरवले होते.