जिल्हयात रासपच संघटन बळकट करणार – प्रदेश उपाध्यक्ष राजपूत

0
8

वाशीम,दि.07ः- रासप हा पक्ष केवळ धनगर समाजसाठीच नव्हे तर बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारा सामान्य जनतेचा पक्ष आहे. आम्ही नेहमीच विकासाचे राजकारण करुन वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत आलो आहे. रासपचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी वाशिम जिल्हयात विशेष लक्ष घालून जिल्हयातही पक्षाचा दबदबा वाढवू, असे विचार रासपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष राजपूत यांनी मांडले.
कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्वâ प्रमुख योगेश नप्ते, ज्ञानेश्वर मुखमाले, युवा जिल्हाध्यक्ष सचिन लांभाडे, बोरकर, गव्हाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रदेश उपाध्यक्ष राजपूत यांच्या मार्गदर्शनात शेकडो युवकांनी रासपमध्ये प्रवेश घेतला. प्रवेश घेतलेल्या कार्यकत्र् देखील आपले विचार मांडून पक्ष संघटन वाढीसाठी सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही दिली. सर्वप्रथम प्रदेश उपाध्यक्ष यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. पुढे बोलतांना राजपूत म्हणले की, रासपाने नेहमीच दीन दुबळयांना न्याय देण्याचे कार्य केले आहे. सामान्य कायकर्त्यांचा नेहमीच व सर्वत्र केवळ वापर केला जातो, मात्र रासपमध्ये कार्यकत्र्यांचा विचार आधी केला जातो. कार्यकर्ता सुखी तर पक्ष सुखी असे आमचें धोरण आहे. आपल्या कार्यकर्त्यांने केवळ पदाचा लाभ न घेता शासन दरबारी खोळंबलेल्या जनतेच्या प्रश्नाची उकल करावी, जर एखादा अधिकारी , कर्मचारी जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असेल तर त्याला अददल घडवावी तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचेल याचा विचार करुन जनसेवा करावी, असे आवाहन राजपूत यांनी केले. या कार्यक्रमाला मोठया संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.