चुका करायला परवानगी आहे- न्यायाधीश संजय देशमुख

0
19
समर्थ विद्यालय, लाखनी येथे कायदेविषयक साक्षरता शिबीर
लाखनी,दि.07ः- तालुका विधी सेवा समिती, लाखनी आणि समर्थ विद्यालय, लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना कायदेशीर साक्षरता शिबिराचे आयोजन समर्थ विद्यालय, लाखनी येथे करण्यात आले होते. या कायदेविषयक शिबिराला जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख, जिल्हा विधी सेवा सचिव कोठारी, लाखनी दिवाणी न्यायाधीश एस पी सदाफळे, सहदिवानी न्यायाधीश पी आर पमनानी, न्यायालय व्यवस्थापक तलमले, खडविकास अधिकारी ब्राम्हणकर, राष्ट्रीय शिक्षण संस्थाध्यक् आल्हाद भांडारकर प्रामुख्याने उपस्थित होते.
अत्यंत मृदू, सौम्य, हसवत, मिस्कील पणे विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुरुवात करून चुका करायला परवानगी आहे, सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे की, चुका न करणारा माणूस जन्मायचा आहे आणि चूका न करणारा न्यायाधीश जन्माला आहे, म्हणून येथे चुका करायला परवानगी आहे. कलम १०० स्वरक्षण करण्यासाठी विविध उदाहरणे दिली. जगातले सर्वांत चांगले विद्यापीठ तर वाईट परिस्थिती हे होय. शिवाजी महाराज, अब्दुल कलाम यांनी परिस्थिती शी सतत लढत राहिले म्हणून ते मोठे झाले, अपयश पचवता आले पाहिजे. जगात काहीही सुरक्षित नाही. निर्णय घेतांना जास्त विचार करून ते टाळणे यापेक्षा एकदा निर्णय घ्यायला पाहिजे.
उत्तम आरोग्य राहण्यासाठी उत्तम झोप, व्यवस्थित जेवण आवश्यक आहे. जीवन जगत असतांना माणसाने नेहमी प्रामाणिक राहावे असे आपल्या प्रमुख कायदेविषयक साक्षरता शिबिरात लाखणीतील तिसरे पुष्प गुंफतांना जिल्हा सत्र न्यायाधीश संजय देशमुख बोलत होते. गट शिक्षणाधिकारी बावनकुळे, ऍड शफी लधानी, ऍड होमेशवर रोकडे, ऍड येळेकर, ऍड जांभूळकर, प्राचार्य दा इ प्रधान, उपप्रचार्य किशोर आळे, पर्यवेक्षक विकास खेडीकर, अजिंक्य भांडारकर, सतीश भोवते, श्रीकृष्ण पटले, विभावरी निखाडे, अभय भदाडे, अक्षय मासुरकर आदी नागरिक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड भारत गभणे, संचालन ऍड प्रशांत गणवीर, आभार संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर यांनी मानले.