भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या निबंध स्पर्धेत डॉ.वर्षा गंगणे परितोषिकाच्या मानकरी

0
11

देवरी,दि.07ः-भारतीय लोकप्रशासन संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या राज्य शाखेच्या निबंध स्पर्धेत डॉ.वर्षा गंगणे तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत. ‘वस्तू व सेवा कर अधिनियम व त्याचा प्रभाव हा त्यांच्या निबंधाचा विषय असून ही स्पर्धा जीएसटी लागू करताना 30 डिसेम्बर2017 रोजी घेण्यात आली होती.स्पर्धेचा निकाल 11 सप्टेंबर 2018 रोजी जाहीर करण्यात आला असून पारितोषिक समारंभ 25 सप्टेंबर 2018 रोजी मुंबई येथे पार पडला. प्रमाणपत्र व 2,500 रु.रोख असे सन्मानाचे स्वरूप होते.
भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या अध्यक्षांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आले.यापूर्वीही त्यांना अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत. बी.जी.देशमुख यांच्या स्मृती निमित्य घेण्यात आलेल्या या निबंध स्पर्धेत त्यांच्या सन्मानाबद्दल अर्थशास्त्र विभागातील डॉ.खांदेवाले,डॉ.आर.वाय. माहोरे,डॉ.मृणालिनी फडणवीस,डॉ.पुष्पा तायडे,डॉ.आर.जी.टाले तसेच डॉ.मृत्युन्जय सिंग,डॉ.अरुण झिंगरे,अनेक शुभचिंतक,प्राध्यापक,सहकारी तसेच गावकरी व विद्यार्थी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे .