गुरुबसव विद्यालयात यशवंतराव चव्हाण विद्यापिठाचा पदवीदान सभारंभ मोठ्या उत्साहात साजरा

0
10

सांगली,दि.07 ;- निव्वळ पदवीसाठी शिक्षण न घेता आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मुक्त विद्यापिठाचे शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे संचालक दादासाहेब मोरे यांनी संख येथील गुरुबसव विद्यालयाचे पदवीदान समारंभ व विद्ययार्त्यांना पदवीचे प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमावेळी व्यक्त केले . यावेळी ग्राहक पंचायत राज्याचे उपाध्यक्ष डॉक्टर विद्याधर किट्टद ,उपसरपंच काशीबाई टोणे ,ज्योती पाटील , गुरुबसव पाटील , भास्कर कोळी ,इटेकर सर ,दिलीप वाघमारे,बिरादार,विशाल वालिकर ,सुरेखा पाटील हे उपस्थित होते

पुढे बोलताना संचालक मोरे म्हणाले की , सध्याचे शिक्षण हे वेगळ्या प्रकारचे चालू आहे . जास्त शिक्षण घेतलेला माणूस आज स्वतःचा फायद्यात गुंतला आहे . यामुळे शहरी भागातील माणुसकी कमी होताना दिसत आहे . पण खेड्यात आजही एखादा नवखा माणूस दिसला की त्याची चौकशी करून माहिती दिली जाते पण शहरी भागात कुणीही कुणाचा विचार करत नाही हे सत्ये आहे पण याला शिक्षण हे कारणीभूत आहे असे म्हणयला हरकत नाही . आज मुलाची शालेय परीक्ष आली की आई वडील यांना झोप लागत नाही दररोज शाळेत जाणार्या मुलांना परीक्षेची कसली भीती आहे  हे कळत नाही .

उपविभागीय कृषी अधिकारी कांताप्पा खोत हे यावेळी बोलताना म्हणाले कि , आपले धायेह निश्चित असेल तर आपण नक्की यश मिळवू शकतो आणि यासाठी अगोदर आपले धायेह ठरवावे लागेल यश निशेचीत मिळेल यासाठी कोणत्या भाषेत शिक्षण घेतले आहे याची कसलीही अडचण येणार नाही.जतचे उपनिबंधक अप्पासाहेब यशवंत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले .   अध्यक्षीय भाषण करताना प्रा. आर बी पाटील सर यांनी समाजातील मुलामुलींचा भेदभाव कमी होण्याअपेक्ष्यचौदा वाढत आहे याला कारण म्हणजे अलीकडील शिकक्षीत माता होऊन देखील मुलाच्या बद्दल आदर मुलगी म्हणजे वेगळे समाजून त्यांना चांगल्या दर्ज्याचे शिक्षण दिले जात नाही . हे कुठेतरी बदलायला पाहिजे . यावेळी जत तालुक्यातही आदर्श शिक्षक पुरस्कार  प्राप्त शिक्षकाचे सत्कार आणि स्वागत कारण्यात आले. प्रास्ताविक आर. बी. पाटील तर सुञसंचलन प्रवीणकुमार वठारे यांनी केले तर आभार प्रा एम जे रानघर यांनी केले