लाच घेतांना तलाठय़ास अटक

0
12

चिमूर दि.07ःतहसील कार्यालय अंतर्गत तलाठी कार्यालय पिंपळनेरी येथे कार्यरत तलाठी विलास लहुजी नागपुरे वय ५४ वर्ष यांनी गावातीलच शेतकर्‍याने स्वत: व भावाने घेतलेल्या शेतजमिनीचे फेरफार प्रकरण मंडल अधिकार्‍याकडे सोपविण्याकरिता ३000 हजार रूपयाची मागणी केली. याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. त्याप्रमाणे आज सापळा रचून दुपारी २ वाजताचा सुमारास तहसील कार्यालयामध्ये दोन हजार रू. स्विकारतांना रंगेहात पकडले.
चिमूर येथे वास्तव्यास असलेले व पिंपळनेरी साज्यात तलाठी म्हणून कार्यरत विलास नागपुरे याने गावातीलच शेतजमीनीचे फेरफार प्रकरण बरेच दिवस अडवून ठेवले. हे प्रकरण लवकर निकाली काढण्याकरिता मंडल अधिकार्‍यांकडे प्रकरण सोपविण्याची मागणी केली. मात्र तलाठठय़ाने त्या बदल्यात ३000 रूपयाची मागणी केली. ५ आक्टोबरला तलाठय़ाशी तक्रारकर्त्याने तडजोड करीत दोन हजार रुपये देण्याचे कबूल केले.
आज दुपारच्या सुमारास तहसील कार्यालयामध्ये सापळा रचून तलाठी नागपुरे याला २000 रू घेतांना रंगेहात पकडण्यात आले. सदर कार्यवाही पोलीस उपायुक्त पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर दुद्दलवार, पोलीस उप अधिक्षक डी.एम.घुगे, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सुभाष गोहोकार, संतोष येलपुलवार, रविकुमार ढेंगळे, राहुल ठाकरे यांनी केली .