बाबरवस्ती जि.प.शाळेची एफ.एम.रेडियोने घेतली दखल

0
10

सांगली,दि.08ः-  जिल्ह्यातील जत तालुक्यांतर्गत येत असलेल्या बाबरवस्ती(पांडोझरी)या शाळेच्या विविध उपक्रमाची एफ .एम ९१.२ येराळावाणी रेडीओ सांगलीच्या चमूने घेतली असून शालेय पोषण आहार व शाळेतील उपक्रमांबदलची माहिती संकलीत केली. ही माहिती 11 आॅक्टोंबरला सकाळी 7 ते 8.30 या वेळेत रेडीओवर प्रसारीत करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बाबरवस्ती( पांडोझरी) ता.जत.जिल्हा सांगली येथे मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता व विविध उपक्रम व ज्ञानरचनावाद या विषयी माहिती जाणून घेतली. व सर्व विद्यार्थी माता पालक व ग्रामस्त यांच्याशी शाळेच्या गुणवत्ते विषयी व शालेय पोषण आहार विषयी माहीती घेतली व शालेय पोषण आहार व स्वच्छेते विषयी मार्गदर्शन केले.एफ एम ९१.२येराळावाणी चला विकासाच बोलु सांगली रेडीओ चमूच्या उदय गोडबोले, सानिका खरे,क्षितिजा केळकर यानी शिक्षक दिलीप वाघमारेंची मुलाखत घेतली आहे.यात १४ ऑक्टोबर२०१८  रोजी संध्याकाळी ६:३० ते ८:00  दरम्यान मुलांच्या कार्यक्रमावर मुलाखत प्रसारित होणार आहे.तरी जत परिसरातील
श्रोत्यानी सर्वानी बाबरवस्ती शाळेतील नाविण्यपूर्ण उपक्रम व विद्यार्थी गप्पा व पालकांशी चर्चा प्रसारित होणार तरी याचा लाभ सर्वांनी घ्यावे असे आवाहन शाळेचे शिक्षक दिलीप वाघमारे यांनी केले.