मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यशाळेला शिक्षकांचा प्रतिसाद

0
53

गोंदिया,दि.08ःःमुलांमध्ये घटनात्मक मुल्य रूजवावीत हे आपल्या देशातील शालेय शिक्षणाचे मुलभूत उद्दिष्ट आहे. यासाठी शालेय स्तरावर हे मुल्य रूजविण्यासाठी नवबौध्द मुलांची निवासी शाळा नंगपुरा र्मुी येथे मुल्यवर्धन प्रशिक्षण कार्यशाळा ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत खमारी, नंगपुरा व आसोली केंद्रातील ५८ प्रशिक्षणार्थी शिक्षकांचा समावेश होता. महत्वाचे म्हणजे हे प्रशिक्षण गोंदिया जिल्ह्यात यावर्षी गोंदिया व सडक अजुर्नी तालुक्यातील राबविण्यात येत आहे.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, न्याय, समता व बंधूत्व या चार मुख्य मुल्यांचा समावेश आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद््घाटन केंद्र प्रमुख एन.बी.कटरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी के.आर.गोटेफोडे, स्नेहल ब्राम्हणकर, आर.एस.पारधी या प्रेरकांनी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना चांगल्या गुणांची सवय कशी लागेल, त्यांच्यामध्ये हे मुल्य कसे रूजविता येतील, या मुल्यांची शाळा स्तरावर कसे उपक्रम हाती घ्यावे, या बाबींवर प्रोजेक्टरच्या माध्यमातून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणला अनेक गट पाडून त्यांच्यात कशी चर्चा घडवून आणली हे प्रात्याक्षिकातून शिक्षकांना सांगितले. या चार दिवसीय कार्यशाळेत डीआसीपीटी गोंदियाचे प्राचार्य राजेश रूद्रकार, केंद्र प्रमुख अंजली ब्राम्हणकर, भुषण डोंगरे, व साधन व्यक्ती विनोद परतेती यांनी मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाच्यात एल.यु.खोब्रागडे, कविता मेर्शाम, प्रेम नखाते यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन विनोद लिचडे यांनी तर आभार आरती सतदेवे यांनी मानले. कार्यक्रमासाठी देशराज रहांगडाले, स्नेहल साठवणे, नागसेन भालेराव, गीता मेंढे, के.एस.ढोरे, डी.आय.खोब्रागडे, सीमा पांडे, नाईक, बी.एम.भोतमांगे, ललीता भुरे, पी.आर.हरिणखेडे व इतर शिक्षकांनी सहकार्य केले.