रामदास वाघमारे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट सामाजिक कार्या बद्दल विश्वशांतीदुत पुरस्कार प्रदान

0
20

औरंगाबाद,दि.08ः- विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील ‘विश्वशांतीदुत’ क्रांतीज्योती महीला बहुद्देशीय प्रशिक्षण केंद्राकडून ‘स्नेह आधार वर्धापन दिनानिमीत्ताने ‘ तंञस्नेही शिक्षक रामदास वाघामारे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल गौरविण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेतर्फे डाँ.सुधीर तारे-वल्र्ड पार्लमेंट सदस्य जागतीक लोकसभा, बाळासाहेब मंगसुळे,कलावंत शताक्षी गुप्ता,चित्रपट निर्माता रविंद्र आरोरा,कोमल उधवानी जयपूर,शरीफ मोहम्मद भोपाल, विश्वशांतीदूत परीवारच्या अध्यक्षा कांचन वीर,औरंगाबाद येथील जेष्ठ पञकार कल्याण अन्नपुर्णे,आदर्श शिक्षका डाँ.रत्ना चौधरी उपस्थित होते.पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला व्यवहारे, शिक्षक वर्ग आण्णा आंधळे, श्रीमती सोनाली पाटील, श्रीमती वर्षा मस्के मँडम तसेच पालक , विद्यार्थी , नातेवाईक , जीवन गौरव परिवार महाराष्ट्र राज्य यांनी विशेष कौतुक करुन अभिनंदन केले.