पद्मश्री डॉ.पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या हदगाव तालुकाध्यक्षपदी विलासराव माने, दिनेश सूर्यवंशी

0
7

नांदेड दि. 8 -पद्मश्री डॉ. विठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या हदगाव तालुकाध्यक्षपदी विलासराव माने व दिनेश पाटील हरडफकर यांची निवड आज शासकीय विश्रामगृह, हदगाव येथे आयोजित बैठकीत करण्यात आली. यावेळी इतर निवडी बैठकीत करण्यात आल्या. यामध्ये शहरध्यक्षपदी शिवम तोष्णीवाल, तालुका सचिव शेख रहीम, तालुका कार्याध्यक्ष अविनाश कदम वायपनकर, तालुका संपर्क प्रमुख अविनाश ताकतोडे, जिल्हा संघटक संदीप वानखेडे यांची निवड करण्यात आली.
बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर, तर अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, विशेष उपस्थितीत जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील आबादार, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पाटील वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद जिल्हाध्यक्ष संगमेश्वर लांडगे पाटील, संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब देसाई, राजू कदम, प्रमोद पतंगे, महानगराध्यक्ष परमेश्वर काळे, जिल्हा सचिव मोतीराम पवार, मंगेश गवळी, श्रीहरी पवार अंबाळकर आदी होते.
यावेळी भागवत देवसरकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कृषी परिषदेच्या कामाची माहिती दिली. हदगाव तालुक्यात लवकरच गाव तिथे शाखा स्थापन करण्यात येणार असून त्या माध्यमातून प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात येतील, असे सांगितले. यावेळी उपस्थितांना प्रशांत पाटील आबादार, संगमेश्वर लांडगे पाटील, नानाराव कल्याणकर आदींनी मार्गदर्शन केले. बैठकीला अमोल कदम रुईकर, संतोष देवसरकर, नितीन पवार, अनिल देवसरकर, नागेश कदम, बाबुराव माने, हरिदास कदम, नागेश मेकेवार, पिंटू हंडेकर, चांदराव कदम, विवेकराज राऊतराव, सौरभ अमुते, सखाराम जाधव यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.