मंदिराचा पुजारीच निघाला आकाशचा मारेकरी

0
9

अकोला,दि.09- एखाद्या सिनेमाचे कथानक होईल, अशी धक्कादायक घटना शहरात उघड झाली आहे. पोलिसांनी तब्बल 29 दिवसांनी एका हत्येचा उलगडा केला आहे. आकाश तूपे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो 9 सप्टेंबरपासून बेपत्ता होता. हत्येप्रकरणी पोलिसांनी मंदिराचा पुजारी विठ्ठल सुखदेव भारती याला अटक केली आहे. आपण घेतलेला देशी कट्टा आकाश परत देत नाही, म्हणून पुजार्‍याने त्याची हत्या केली. नंतर त्याचा मृतदेह मंदिराच्या परिसरात पुरल्याची कबुली आरोपीने दिली आहे.मिळालेली माहिती अशी की, अकोल्यातील आकाश तूपे हा युवक महिनाभरापासून बेपत्ता होता. आकाश 9 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता दुकान बंद करून घराकडे निघाला होता. मात्र, रात्री उशीर झाला परंतु तो घरी पोहोचला नाही. आकाशच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार खदान पोलिसांत नोंदविली होती.