पंचायत समितीच्या नव्या इमारतीच्या हस्तांतरणासाठी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना साकडे

0
6
बिलोली( सय्यद रियाज ),दि.10ः- येथील पंचायत समिती कार्यालयाची इमारत पुर्णतः मोडकळीस आली असून नव्या इमारतीचे बांधकाम सुध्दा पुर्ण झालेले असताना नव्या इमारतीचे हस्तांतरण पंचायत समितीला न झाल्याने तालुकावासियांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना साकडे घालून नव्या इमारतीचे त्वरीत लोकार्पण करुन कामकाज सुरु करण्याची मागणी केली आहे.सविस्तर असे की, केदार पाटील साळुंके यांनी इमारतीच्या हंस्तारणासाठी टाळे ठोको आंदोलन केले असता 15 ऑगस्टला ध्वजारोहण करून हस्तांतरण करण्याचे लेखी पत्र प्रशासनाने दिले होते.मात्र त्यावेळीही इमारत हस्तातंरीत करण्यात आली नाही,परत आंदोलनाचे पत्र दिल्यावर 17 सप्टेंबरता मुहूर्त ठरविण्यात आला, मात्र मुहूर्त गेल्याने तालुक्यात श्रेयवादासाठी इमारतीचे हस्तांतरण रखडवले जात असल्याची टिका सुरु झाली आहे.
बिलोली पंचायत समिती कार्यालयाच्या नवीन इमारतीे काम पूर्ण होऊन दोन  वर्षे होत असून काही किरकोळ कामासाठी कार्यालय हस्तांतरण रखडले आहे. ते पूर्ण करून हस्तांतरण करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.त्यासाठी प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस केदार पाटील साळुंके यांनी वर्षभरापासून पाठपुरावा चालवलेला असून 21 जुलै रोजी जुन्या पंचायत समिती कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केले होते. त्यावेळी जागे झालेल्या प्रशासनांनी उर्वरित काम युद्ध पातळीवर करून 15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्याचे लेखी आश्वासनही दिले व तशी कामेही पूर्ण करण्यात आली. मात्र तालुक्याच्या राजकारणात श्रेय वाद पुढे आला आणि सत्ताधारी गटाने 15 ऑगस्टचा मूर्त टाळण्यासाठी मुखमंत्र्यांच्या हस्ते 17 सप्टेंबरला उदघाटन करणार म्हणून जाहीर केले. मात्र 17 सप्टेंबरचाही मूर्त टळल्याने तालुक्यात श्रय वादातून हस्तांतरण होत नसल्याचे चर्च्यांना उधान आले आहे. पंचायत समिती उपसभापतीनी आतिक्रमणाा मुद्दा पुढे करून अतिक्रमण उठे पर्यंत हस्तांतरण करणार नसल्याचे जाहीर केले.त्यावर साळुंखेनी आतिक्रमणाचा प्रश्न होता तर 15 ऑगस्ट व 17 सप्टेंबर हे मूहूर्त कसे ठरले होते अशा प्रतिप्रश्न करुन सत्ताधारीच हस्तांतरणाला विरोध करीत असल्याचे लक्षात येताच  नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन पंधरा दिवसातस पंचायत समिती कार्यालय इमारतीचे हस्तांतरण करण्याचे साकडे घातले असून हस्तांतरण न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा दिला आहे.