१० वे युसीमास एबेकस व बौद्धिक चाचणी स्पर्धा

0
20
गोंदिया(पराग कटरे)दि.10ः- भंडारा येथील लक्ष्मी सभागृहात विभागीय स्तरावर १०  युसीमास एबेकस व बौद्धिक चाचणी स्पर्धा चे भव्य आयोजन द्वारा करण्यात आले . या स्पर्धेत गोंदिया देवरी भंडारा गोरेगांव तसेच परिसरातील इतर ठिकाणाहूनही विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे. एकूण पाच वेगवेगळ्या विभागात लिसनिंग व क्लास अशा स्पर्धेत भाग घेण्यात आले. या स्पर्धांमध्ये एकूण 450 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
      या प्रसंगी दिलीप जैन यांनी ucmas बद्दल सविस्तर माहिती दिली यातून गणितीय गणना तसेच विद्यार्थ्यांची एकाग्रता ,कल्पनाशक्ती ,गती, एकता ,तसेच तर्कशक्ती कशी वाढते या विषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. तसेच प्रमुख परीक्षक म्हणून श्री आशिष जी पालीवाल आणि नवनीत राजभोज यांनी आपली कामगिरी पार पाडली. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. ‘z’ या सर्वोत्कृष्ट श्रेणीत कल्याणी टिचकुले, अक्षीत निमजे यांनी बाजी मारली तर ‘a’ या श्रेणीत केतन चव्हाण ,माही डोमडे तर ‘b’ श्रेणीत उन्नती कथने सुधांशू वासनिक तसेच ‘c ‘ या सर्वात उत्कृष्ट श्रेणीत रुची इसरका, पारस रहमतकर पलक बजाज, जान्वही मेंढे यांनी बाजी मारली. पियुष जैन यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिलीप जयंत,मोहित पालीवाल, पियुष जैन, अंजना पालीवाल, अजय पालीवाल, महेंद्र जैन आणि अँबाकस ची संपूर्ण चमू यांनी परिश्रम घेतले .