पोलीस अधिकारी यांनी मुख्यालयी राहत आपल्या कार्यक्षेत्रात रात्रीला गस्त वाढवून स्वतःगस्तीवर जाण्याचे निर्देश पोलीस अधिक्षकांनी दिले होते.त्यानुसार पोलीस अधिक्षक बैजल यांनी रात्री बेरात्रीला प्रत्येक पोलीस ठाणेपरिसरात जाऊन पाहणी करण्यास सुरवात केली.त्यामध्ये गंगाझरी पोलीस ठाणे परिसरात गेल्या काही दिवसात रात्रीला भेट देऊन गस्त घातले असता पोलीस निरिक्षक या आपल्या मुख्यालयी निवासस्थानीच राहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.बैजल यांनी मंगळवारला गंगाझरी पोलीस ठाण्याला रात्री भेट दिली असता पोलीस निरिक्षक शितल जाधऴ या घरीच असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी बुधवारला कर्तव्यात कसुर केल्याच्या ठपका ठेवत निलबिंत केले आहे.