सत्यशोधक विचार मंचतर्फे जाहीर व्याख्यान

0
4

ब्रम्हपुरी,दि.11ः- येथे सत्यशोधक विचार मंचच्यावतीने दि. १२ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ६ वा. झांसी रानी चौक, कब्रस्तान रोड, येथे जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे .
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अमोल दादा मिटकरी, मुलुख मैदानी तोफ, संभाजी ब्रिगेड हे असून, मुख्य अतिथी म्हणून, समाज कल्याण विभाग नागपूरचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड ,न. प. चे मुख्याधिकारी मंगेश खेवले तर अध्यक्षस्थानी तहसीलदार विद्यासागर चव्हाण राहणार आहे.तसेच कार्यक्रमाचे उद््घाटन प्रा. देवेश कांबळे करणार आहे. १३ ऑक्टोबर रोजी सांय. ६ वा. जाहीर व्याख्यान आयोजित केले असून, प्रमुख वक्ते सामाजिक कार्यकर्ता सर्वजीत बनसोडे धुळे राहणार आहे.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथि म्हणून, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेसी राहणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. खिजेन्द्र गेडाम असून,उद्घाटक राजू झोडे राहणार आहेत. जास्तीत जास्त संख्येंनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन सत्यशोधक विचार मंच, ब्रम्हपुरीचे सचिव अभिजीत कोसे व उपाध्यक्ष विवेक रामटेके यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.