मांडादेवी येथे रोगनिदान शिबिराचे आयोजन

0
10

गोंदिया,दि.11 : गोरेगाव तालुक्यातील सूर्यादेव मांडोदेवी देवस्थान समिती व विदर्भ इ्स्टिटट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क रोगनिदान शिबिराचे आयोजन सूर्यादेव मांडादेवी देवस्थान बघेडा (तेढा) येथे १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.संस्थेचे सचिव विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, असे बरेच रोग आहेत ज्यांची माहिती खूप उशिरा लागते आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे अशा रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. या उद्देशाने सूर्यादेव मांडोदेवी देवस्थानात नि:शुल्क हृदय रोग, हड्डी रोग, मस्तिष्क रोग, कॅन्सरसारख्या जिवघेण्या रोगांची तपासणी करण्यात येईल. रुग्णांची तपासणी डॉ. नितीन खंडेलवाल, डॉ. हरिशंकर गुप्ता, डॉ. आशिष बदखल, डॉ. प्रफुल्ल बोरकर, डॉ. निलय हांडे, डॉ. विवेक अग्रवाल यांच्यामार्फत करण्यात येईल. या रोगनिदान शिबिराचा लाभ नागरिकांना मोठ्या संख्येने घेण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष भैयालाल सिंदराम, सचिव विनोद अग्रवाल, कोषाध्यक्ष विश्वनाथ असाटी, सहसचिव कुसन घासले, सीताराम अग्रवाल, डॉ. लक्ष्मण भगत, सदस्य सखाराम सिंदराम, शालिकराम उइके, गणपतलाल अग्रवाल, नंदकिशोर गौतम, डॉ. जितेंद्र मेंढे, हुकूमचंद अग्रवाल, अयोध्यादास पुजारी, प्रेमलाल धावडे, श्यामराव ब्राह्मणकर, रोशन मडावी, शिवा सराठे, योगराज धुर्वे यांनी केले आहे.