भाजयुमो जिल्ह्यात राबविणार ‘खेलो महाराष्ट्र खेलो युवा’ व  ‘मुख्यमंत्री चषक’ कार्यक्रम

0
9
गोंदिया,दि.11 : भाजयुमो गोंदिया जिल्ह्याच्या वतीने ‘खेलो महाराष्ट्र खेलो युवा’ व ‘मुख्यमंत्री चषक’ कार्यक्रमाच्या विषयावर १० ऑक्टोबर रोजी भाजपा जिल्हा कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत प्रामुख्याने भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, प्रदेश उपाध्यक्ष रमेश कुथे,  भाजयुमो महाराष्ट्र प्रभारी अतुल कुमार, जिल्हा संघटन महामंत्री वीरेंद्र अंजनकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले उपस्थित होते.  यावेळी अतुल कुमार यांनी आगामी २७ व २८ ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशन व मुख्यमंत्री चषक यावर मार्गदर्शन केले. यात त्यांनी मुख्यमंत्री चषक हे ५० लक्ष युवकांना विविध माध्यमातून जोडण्याचा उद्देश असल्याचे सांगून स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय पटलावर आणायचे असल्याचे सांगितले. भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चा कार्यकर्त्यांना कठोर मेहनत घेण्याचे आवाहन केले. भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज राहंगडाले यांनी आपल्या प्रस्तावनेतून कार्यक्रमाची रूपरेषा मांडत जिल्ह्यात राबविणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाची संपूर्ण माहिती दिली.
या वेळी मुख्यमंत्री चषक या कार्यक्रमासाठी जिल्हा संयोजक पदाकरिता रोहित अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच गोंदिया विधानसभा संयोजक पदावर राहुल यादव व सहसंयोजक समीर आरेकर यांची, देवरी-आमगाव विधानसभा संयोजक पदी छोटु भाटिया व  सहसंयोजक कमलेश चुटे, अर्जुनी मोरगाव विधानसभा संयोजक पदी संदीप कापगते व सहसंयोजक हितेश डोंगरे व तिरोडा विधानसभा संयोजक पदावर ओम कटरे व सहसंयोजक पुष्पराज जनबन्धु यांची नियुक्ति करण्यात आली. या वेळी बैठकीत जिल्हा महामंत्री ऋषिकांत साहू, ललित मानकर, पंकज सोनवाने, अभय मानकर व  सर्व मंडल अध्यक्ष,महामंत्री व प्रमुख कार्यकर्ता उपस्थित होते. संचालन महामंत्री पंकज सोनवाने यांनी केले व आभार ऋषिकांत शाहू यांनी मानले.