वेतन कपात करु नये अन्यथा 20 आॅक्टोंबरपासून पुन्हा आंदोलन

0
13

गोंदिया,दि.११ः-आॅगष्ट महिन्यात संपावर गेलेल्या शिक्षकांचे व कर्मचा-यांचे संपकालीन वेतन कपात करण्यासाठी शासनाचे कुठलेही आदेश नसतानाही व राज्यातील कुठल्याही जिल्हापरिषदेने संपकाळातील वेतन कपात केलेले नसतानाही गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकार्यांनी वेतन कपातीचे आदेश निर्गमित केल्याने शिक्षकासंह कर्मचारी वर्गात मोठा असंतोष उफाळून आलेला आहे. त्यामुळे शासनाचे जोपर्यंत वेतन कपातीचे आदेश येत नाही,तोपर्यंत वेतन कपात करण्यात येऊ नये अन्यथा 20 आॅक्टोंबरपासून उपोषण आंदोलन सुरु करण्यासंबधीचे निवेदन आज जिल्हा परिषद अध्यक्ष सीमाताई मडावी यांना प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने देण्यात आले.निवेदन देतेवेळी शिक्षक समिती अध्यक्ष मनोज दिक्षित, सरचिटणीस एल यु खोब्रागडे, शिक्षक नेते एन बी बिसेन,जे डी मेश्राम,जी आर. अग्रवाल, एच बी भारद्वाज, अंजन कावळे उपस्थित होते.सदर निवेदनासोबतच इतर प्रश्नावर चर्चा सुध्दा करण्यात आली.