बसमध्ये आढळले सालेकसातील चोरीचे सात लाखांंचे सोन्या-चांदीचे दागिने

0
11

नागपूर,दि.12 : गोंदिया बस आगारातून मंगळवारी रात्री नागपूर येथे आलेल्या गोंदिया-नागपूर बसमधील बेवारस बॅगमध्ये ७ लाख ४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने आढळल्याने खळबळ माजली.त्यातच नागपूर परिवहन विभागाच्या प्रमुखांनी पोलीसांना लगेच माहिती देण्याएैवजी टाळाटाळ का केली हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून आणले होते. पण पकडल्या जाण्याच्या भीतीने त्याने बॅग बसमध्येच सोडून पळ काढला. या दागिन्यांच्या चोरीची तक्रार गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील एका सराफा व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. बॅगमध्ये दागिने असल्याचे पाहून ते आपसात वाटून घेण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांच्यात वाद झाल्याने बुधवारी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले.गोंदिया येथून मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास एमएच १४/बीटी ५०१८ क्रमांकाची बस नागपूर येथे आली. ती आगारात उभी करण्यात आली. बस उभी करून चालक डी.आर. काकडे आणि वाहक डब्ल्यू.डी.धार्मिक हे घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना बसच्या मागच्या सिटवर काळ्या रंगाची बॅग नजरेस पडली. बॅग उघडून न पाहता त्यांनी सोबत घेतली आणि घाटरोडवरील एसटी आगाराच्या महिला प्रबंधक एस.बी.सिरसाट यांच्याकडे जमा करण्यासाठी घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांनी बॅग उघडली असता त्यातील सोन्याचांदीचे दागिने दिसले.परंतु त्यांनी पोलीसांना लगेच माहिती न देता आपल्याकडेच ठेवली परंतु गणेशपेठ पोलीसांना माहिती होताच त्यांनी घाटरोड आगारात जाऊन ती पिशवी त्याब्यात घेतली.चौकशी अंती ते दागिणे सालेकसा येथे चोरट्यांनी केलेल्या ज्वेलर्शमधील असल्याचे तपासात समोर आले.