पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी 

0
9
– भाजप कार्यकर्त्यांनी दिले निवेदन
गोंदिया,दि.१२ ःः काँग्रेस पक्षाकडून ११ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. यात त्यांनी जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद करून त्याठिकाणी लावण्यात आलेल्या उज्वला योजनेच्या होर्डिंगवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावर काळी शाई लावून विद्रुपीकरण केले व खालच्या भाषेत नारेबाजी करून त्यांचा अपमान केला. पंतप्रधानांचा अपमान म्हणजे हा जनसामान्यांच्या भावना दुखावणारा व देशाचा अपमान आहे. यात काँग्रेसची विकृत मानसिकता दिसून येते. या घटनेत भाजप कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून हे दुष्कृत्य करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करून कठोर शिक्षा करावी. अन्यथा भारतीय जनता पार्टी तर्फे उग्र आंदोलन करण्याचा इशारा, शुक्रवारी १२ ऑक्टोंबर रोजी भाजप कार्यकर्त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांना निवेदन देऊन केला.
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात भाजपच्या एका शिष्टमंडळाने उपविभागीय पोलिस अधिकारी यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी बरकते यांच्याशी चर्चा करून कार्यकर्त्यांच्या भावना या विषयाला घेऊन तीव्र असल्याचे सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी का अपमान, नही सहेगा हिंदुस्तान’ अश्या घोषणा दिल्या. यावेळी प्रामुख्याने जिल्हा महामंत्री भाऊराव उके, जिप सभापती शैलजा सोनवाने, शहर अध्यक्ष सुनील केलनका, जिप सदस्य कमलेश्वरी लिल्हारे, नप सदस्य दिनेश दादरीवाल, नप सभापती दीपक बोबडे, मजूर सहकारी संघाचे उपाध्यक्ष दीपक कदम, नंदकुमार बिसेन, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुलकर्णी,  भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले,  न प सदस्य बंटी पंचबुद्धे, गजेंद्र फुंडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जयंत शुक्ला, अमित झा,अहमद मणियार, हंसू वासनिक, राजू पटले, बाबा बिसेन, मुकेश चन्ने, अशोक हरिणखेडे, लखन हरिणखेडे, संजय मुरकुटे, मुकेश हलमारे, कमलेश सोनवाने, बबलू रहांगडाले, रुपेश कुथे,प्रशांत कोरे,घनश्याम लिल्हारे, रवि ठकरानी,राजकुमार गणवीर,  अजय नागपुरे, नितिन भदाडे, राहुल फेंडारकर, दिलीप मुंडेले, कैलाश कुंजाम, मुन्ना हरिनखेड़े, पप्पू हलमारे,धोटे, जियालाल बोपचे, पंकज भिवगड़े, कैलाश कुंजाम, योगेंद्र हरिनखेड़े, संजू ठाकुर पुनेश्वर बरडे आदी उपस्थित होते.