नवीन एसआरएस-एक्सबी०१ स्पीकर्ससोबत आपल्या एक्स्ट्रा बेसख़् सीरीजमध्ये सोनीचा विस्तार

0
29

नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर २०१८: सोनी इंडियाने आज नवीन एक्स्ट्रा बेस वायरलेस स्पीकर एसआरएस-एक्सबी०१ ची सुरूवात केली असून हे त्यांच्या मोठ्या नावाजलेल्या एक्स्ट्रा बेस सीरीजचे एक्स्टेंशन आहे. पॉकेटच्या आकाराच्या एसआरएस-एक्सबी०१ मधून ऑन-दि-गो शक्तीशाली एक्स्ट्रा बेस आवाज मिळतो आणि ज्या लोकांना डान्स म्युझिक आणि पार्टी करायला आवडते त्यांच्यासाठी मनसोक्त पार्टी अनुभव प्रदान करण्यासाठी उच्च गुणवत्ता प्रदान करण्यासाठी उच्च गुणवत्ता प्रदान करण्याकरिता हा खास डिजाईन करण्यात आला आहे.

एक्स्ट्रा बेसख़् सोबत शक्तीशाली आवाज

एसआरएस-एक्सबी०१ हा उच्च आवाज दबावासह खोल आणि समृद्ध बेस निर्माण करतो, जो उपयोगकर्त्यांच्या आवडत्या चालींमध्ये आणखी सुधारणा करतो. हा छोटा, पॉकेटच्या आकाराचा स्पीकर प्रत्येक ठेक्याला समृद्ध बनवतो आणि कुठल्याही पार्टीला एक्स्ट्रा बेसख़् आवाजासोबत बूस्ट देतो. यातील कॉम्पॅक्ट, गोलाकार डिजाईन, पुढच्या बाजूने फूल रेंज स्पीकर युनिट आणि मागच्या बाजूला पॅसिव्ह रेडिएटर खोल आणि पंची आवाज प्रदान करतो. याचा आकार छोटा असला तरी ऑनदिगो याचा आवाज मात्र मस्त मोठा मिळतो.

आयपीएक्स५ रेटिंगसह स्प्लॅश प्रूफ

ह्या स्पीकरचे डिजाईन वॉटर-रेझिस्टंट असून आयपीएक्स५ रेटिंगसोबत स्प्रे आणि पाणी सांडले तरी त्याचे संरक्षण होते. त्यामुळे उपयोगकर्ता इनडोअर आणि आऊटडोअर कुठल्याही भीतीशिवाय संगीत वाजवू शकतात.

नॉन-स्टॉप संगीतासाठी ६ तासांचे बॅटरी आयुष्य

एसआरएस-एक्सबी०१ मध्ये ६ तासांचे बॅटरी आयुष्य१ लाभते, त्यामुळे उपयोगकर्त्यांना त्यांचे आवडते अल्बम्स आणि प्लेलिस्ट्स विनाअडथळा ऐकता येतात. याशिवाय हा स्पीकर खास ईडीएम प्रकारच्या संगीतासाठी खास डिजाईन करण्यात आला असून त्यामुळे अगदी कुठेही पार्टीसारखे वातावरण निर्माण करता येते.

वजनाने कमी आणि स्ट्रॅपसोबत वाहून नेण्यास सुलभ

याचे वजन सुमारे १६० ग्रॅम्स असून एसआरएस-एक्सबी०१ हा आकाराने लहान आणि वजनाने हलका आहे. त्यामुळे तो कुठेही अगदी सहजपणे घेऊन जाता येतो. हा स्पीकर वाहून नेण्यासाठीच खास डिजाईन करण्यात आला असून त्यासोबत मॅचिंग रंगांची हॅन्डी स्ट्रॅप आहे. त्यामुळे हा सहज उचलता, वाहून नेता तसेच कुठेही टांगता येतो.

ब्लूटूथ्रु सोबत सहज कनेक्टिव्हिटी्रु

एक्स्ट्रा बेस सीरीजमधील नवीन भर असलेल्या ह्या स्पीकरमध्ये बिल्ट-इन मायक्रोफोन असून त्यामुळे ब्लूटूथ्रु अनुरूपतेमधून हॅन्ड्स-फ्री कॉलिंग आणि सहज कनेक्टिव्हिटी मिळते. यात संगीताचा दुसऱ्या पद्धतीने आनंद घेण्यासाठी ऑडिओ इन्पुटच्या माध्यमातून प्लेबॅकही मिळतो. ह्याव्यतिरिक्त, उपयोगकर्ता संगीताचे नियमन करण्यासाठी ऑनस्पीकर बटणांचा वापर करून हा स्पीकर कनेक्ट, प्ले किंवा आवाजही वाढवू शकतात.