प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय तायक्वाँडो स्पर्धेत निवड

0
13

गोंदिया,दि.13ः-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने भंडारा येथे आयोजित विभागीय तायक्वाँडो स्पर्धेत श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गोंदियाद्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह इंग्लीश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून राज्यस्तरीय तायक्वाँडो स्पधेर्साठी निवड करण्यात आली. राज्यस्तरीय तायक्वाँडो स्पर्धेत कु.तमन्ना सहारे, सेजल तुरकर यांची निवड करण्यात आली.
यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडील व संस्थाध्यक्ष डॉ.पंकज कटकवार, डॉ.एन.आर.कटकवार दिला. प्राचार्य ओ.टी.रहांगडाले, कुमुदिनी तावाडे, श्रीमती वाय आशा राव, मिनाक्षी महापात्रा, विकास पटले, प्रमोद वाढी, रूपकला रहांगडाले, क्रीडा अध्यापिका ज्योति पहिरे, पंकज खैरे हेमा नायडू, डॉली गजभिये, प्रियंका भरणे, मंगला कटरे, खुशबू भांडागकर, पालेंद्र मेंढे, मुकेश शेंडे, राहुल रामटेके दिव्यांशू जैसवाल तसेच सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.