आरोग्य विभाग सालेकसा पुन्हा एकदा वादाच्या भाेवऱ्यात 

0
6
सालेकसा,दि.13-ः नुकत्याच झालेल्या गीता पांढरे ह्या गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे चर्चेत असलेले आरोग्य विभाग सालेकसा पुन्हा एकदा वादाच्या भावऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. आरोग्य विभाग सालेकसा तर्फे माहिती अधिकार अंतर्गत मागवल्या माहितीला प्रथम अपील साठी मागणी केल्यावर अपील च्या सूनवणीचे पत्र अर्जदारास पाठवण्यात आले. परंतु बघायचे काय तर त्या नोटीस मध्ये तर सूनवणीचे  तारीखच दिली नाही. अर्जात तारीख दिली नसल्याने किती तारखीला हजर राहावे हे प्रश्न पडले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांचे माहिती अधिकाऱ्याकडे किती लक्ष असावे ह्यावरून लक्षात येते. असे प्रकार प्रशासनातर्फे होणे म्हणजे माहिती अधिकाराबाबद अधिकाऱ्यांची उदासीनता नजरेस पडते. तालुक्यातील विविध स्तरावर माहितीच्या अधिकारासाठी अशीच विविध मार्गाने बगल देण्याचा प्रकार आढळून येते. कधी सण उत्सवाच्या दिवशी तारीख देणे तर कधी तारखेच्या एक दिवसआधी पत्र पोचवणे असे प्रकाराने अपील साठी गैरहजर असल्याने एकतर्फी निकाल लावण्याच्या प्रकार नवीनच असताना आता चक्क बिना तारीख लिहताच नोटीस बजावली असल्याने प्रकार आरोग्य विभाग सालेकसा तर्फे करण्यात आले आहे. Rti कार्यकर्त्यांना ह्यातून कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.