आपत्ती निवारणासाठी जनजागृती व दक्षता महत्वाचे: जिल्हाधिकारी बलकवडे

0
20

गोंदिया,दि.13ः- आपत्ती निवारण दिनानिमित्त आयोजीत वाॅकथॉन रॅली व रंगीत तालीम) कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे म्हणाल्या की आपत्ती दरम्यान सामना करण्यासाठी जनजागृती व दक्षता महत्वाची आहे.आपत्तीचे पूर्वनियोजन आवश्यक असले तरी दक्षता घेणे ही प्रत्येकासाठी तितकेच महत्वाचे आहे.
आज 13 ऑक्टोबरला आपत्ती निवारण दिनाचे औचित्यसाधून सकाळी 6 वाजता इदिरा गांधी स्टेडियम येथे वाॅकथॉन रैलीचे आयोजन करण्यात आले होते.रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी झेंडी दाखविली व स्वतः सहभागी होऊन नागरीकांना आपत्ती निवारणासाठी सज्ज राहण्याचे संदेश दिला. या वेळी पोलीस अधीक्षक हरीश बैजल,निवासी उपजिल्हाधिकारी हरीश धार्मिक, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस निरीक्षक मनोहर दाबाडे,प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गागंरेड्डीवार प्रामुख्याने उपस्थित होते.

रॅली शहरातील मुख्यमार्गातुन काढण्यात आली. रॅलीमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,बॉम्ब शोधक पथक, अग्नीशमन विभाग न.प. गोंदिया, अग्निशमन विभाग अदानी पॉवर महाराष्ट्र, वाहतूक विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभागतील अधिकारी व कर्मचारी ,विभिन्न सामाजिक संगठना, ncc,nss, स्काऊट गाईड, होमगार्ड विभागाचे अधिकारी,कर्मचारी, जिल्हाशोध व बचाव पथकाचे सदस्य सहभागी झाले होते. रॅली नंतर बॉम्ब शोधक पथकाने रंगीत तालीम दिली तर अग्निशमन विभाग अदानी व न.प गोंदियाच्यावतीने अग्निसुरक्षा व उपाय योजनेवर प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. त्यानंतर वाॅकथान रॅलीतील 20 विजेत्यांचे नावे ड्रा पध्दतीने जाहीर करुन त्यांना पुरस्कार देण्यात आले.संचालन आपत्ती अधिकारी राजन चौबे यांनी केले.