भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे 11 एटीएमचे उदघाटन

0
30
भंडारा,दि.१३ : नवरात्राच्या शुभमुर्हतावर भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने सिहोरा, गोबरवाही, सानगडी, दिघोरी, पहेला येथे मोठ्या थाटात एटीएम सेवेचा शुभारंभ केला.भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकर्‍यांची बँक असून या बँकेचे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग हा ग्राहक आहे. यांच्या सुख सोयीसाठी नवरात्रीच्या शुभमुर्हतावर ११ एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. या एटीएम उद्घाटन प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे तथा भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे  खा. मधुकभाऊ कुकडे उपस्थित होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून बँकेचे संचालक कैलाश नशीने, कलाम शेख, हिरालाल नागपूरे, अरविंद राऊत, ढबाले, शैलेश मिश्रा, बांडेबुचे, तुरकर, दिलीप सोनवाने, बाळकृष्ण गाढवे, हरींद्र राहांगडाले, पत्रकार बेलुरकर, रामदयाल  पारधी, रामलाल चौधरी, योगेश हेडाऊ, नरेंद्र बुरडे, सत्यवान हुकरे, सरव्यवस्थापक संजय बरडे यांची उपस्थिती लाभली.
उद्घाटन प्रसंगी फुंडे म्हणाले की, बँक शेतकर्‍यांकरीता व बँकेच्या ग्राहकांकरीता नेहमीच सकारात्मक भूमिकेत काम करीत असते. एकूणच शेतकर्‍यांची बँक म्हटंल्याव ग्रामीण भागातील शाखेंमध्ये होणारी गर्दी व ग्राहकांना बँक सेवेचा लागणारा वेळ या सर्व बाबी लक्षात घेवून जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्रत्येक शाखेत एटीएम केंद्र सुरू करण्याचा मानस केला आहे. या सेवेचा शेतकरी बाधंवांनी लाभ घ्यावा असे प्रसंगी बोलले. विशेष म्हणजे आमचे एटीएम कधीच बंद पडणार नाही, व एटीएम मध्ये २४ तास कॅशची सुविधा राहणार असल्याचेही प्रसंगी सांगितले. नवरात्रीच्या उत्सवात ११ एटीएम सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले.
भंडारा – गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. मधूकर कुकडे यांनी उद्घाटन प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकर्‍यांच्या पाठीशी उभी राहत असून ही बँक म्हणूनच शेतकर्‍यांना आपलीशी वाटते. गोरगरीबांच्या व शेतकर्‍यांच्या हक्काची बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक अशी या बँकेची ख्याती झाली आहे. विशेष म्हणजे शासनाच्या सर्वच योजना ही बँक राबवते. परंतु शासनाकडून बँकेला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही. हे या ठिकाणी आवर्र्जुन सांगावेसे वाटते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा डोलारा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे व त्यांचे संचालक मंडळ यांच्यामुळेच सुस्थितीत उभा आहे. त्यामुळे त्यांचे याप्रसंगी कौतुक केलेच पाहिजे. असे म्हणून पुढील वाटचालीसाठी खासदार महोदयांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला मो’्या प्रमाणात जनतेचा सहभाग मिळाला हे विशेष. उद्घाटन प्रसंगी बँकेचे कर्मचारी व ग्राहक मोठया प्रमाणात उपस्थित होते.