जोडीदार निवडतांना शिक्षणाला व कलागुणांना महत्त्व द्या : अनिल गायकवाड

0
18
बौध्द धम्मीय उपवर-वधू परिचय मेळावा
गोंदिया,दि.14 : आजच्या काळात अनेक समस्या पैकी विवाह ही एक समस्या झाली आहे. कर्ज बाजारी होउुन विवाह करण्यापेक्षा तो कमी खर्चात करण्याला प्राध्यान्य द्यावे, यासाठी उपवर-वधू परिचय मेळावे आणि सामुहिक विवाह सोहळा काळाची गरज आहे. जोडीदार निवडताना सौंदर्याला महत्त्व न देता शिक्षणाला व कला गुणांना महत्त्व दिले पाहिजे असे मत बौध्द मनोमिलन नागपूर संस्थेचे अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी व्यक्त केले.
बौध्द मनोमिलन नागपूर यांच्या तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, बौध्दनगर, मरारटोली, गोंदिया येथे उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी नगरसेवक घनश्याम पानतावणे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी उपायुक्त अनिल गायकवाड, निलेश बडोले, आडे गुरुजी, प्रफुल्ल खोब्रागडे, शंकर बनकर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकातून विवेक मेश्राम यांनी परिचय मेळाव्यात एकाच ठिकाणी जास्तीत जास्त युवक-युवती बघायला मिळाव्यात आणि पसंत पडलेल्या युवक-युवतीच्या पालकांशी संपर्क साधून पुढील प्रक्रिया करणे सोयीचे व्हावे या दृष्टिकोणातून उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. समाजातील उपवर-वधु मुलामुलींनी तसेच जे उपवर-वधू उपस्थित नव्हते त्यांच्या पालकांनी मंचावर येउुन परिचय दिला. कार्यक्रमाचे संचालन कु. निशा राउुत यांनी तर विवेक मेश्राम यांनी आभार मानले. बौध्दम‘नोमिलन गृ्रपचे सदस्य संदिप टेंभूर्णीकर यांनी निःशुल्क रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यात त्यांना त्यांचे सहकारी अपर्णा नागभिरे, भारती राउुत यांनी सहकार्य केले. यामध्ये थायरॉइड आणि सिकलसेलची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमासाठी संदिप टेंभूर्णीकर, रितेश शहरे, बिपलाप उके, अतुल गजभिये, अजय बोरकर, दिलीप शहारे, अमोल वैद्य, विशाखा राउत यांचे सहकार्य लाभले.