ओपीडीच्या पैश्यातुन औषधी खरेदी करतात डॉक्टर

0
13

 गोरेगाव,दि.१४:- येथील तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातंर्गत तालुक्यात पाच प्राथमिक केंद्रात ६ महीण्यापासुन रोग प्रतीबंधक औषधी उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या सेवेकरीता आवश्यक असलेल्या औषधी ची खरेदी ओपीडीच्या जमा रक्कमेतुन वैद्यकीय अधिका-यांना करावी लागत आहे असी माहीती समोर आली आहे तालुक्यात सोनी,चोपा, तिल्ली मोहगाव, कु-हाडी, कवलेवाडा असे ५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत व त्या अंतर्गत उपकेंद्रे आहेत या केंद्रात ६ महीण्यापासुन औषधी नाहीत पावसाळा, हिवाळा, उन्हाळ्यात या काळात स्वच्छतेअभावी मोठ्या प्रमाणात विविध आजार गावागावात होत असतात यावर नियंत्रण ठेवता यावे. म्हणुन औषधी प्राथमिक आरोग्य केंद्रात असने आवश्यक आहे. परंतु औषधी पुरवठा प्रश्न हा वरच्या स्तरावरुन गंभीर समस्या उदभवल्याची चर्चा होत आहे औषधी साठा नसल्याने ओपीडीच्या रुग्णावर प्राथमिक उपचार करने कठीन झाले आहे. पण रोग प्रतीबंधक ज्या औषधी आवश्यक आहेत त्या औषधींना बाहेरुन ओपीडीच्या जमा पैश्यातुन खरेदी कराव्या लागत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती, औषधी आवश्यक साठा पुरवठा करणे , नवनव्या शासनांनी लागु केलेल्या योजना राबवुन घेणे व नियंत्रण ठेवण्याचे काम करणे जिल्हा परिषदेचे आहे. औषधी तुटवटेची माहीती सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रानी दिलेल्या असल्या तरी औषधी आवश्यक पुरवठा करण्यात आलेले नाही. वरीष्ठांनी गोरगरीब गावकरी रुग्णांची समस्या लक्षात घेता तात्काळ औषधी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी नागरीकांनी केली.

प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांना रुग्णाची सेवा औषधी तुटवटेमुळे करता येत नाही .मात्र काही औषधी खरेदी करुन रुग्णसेवा सुरु  असल्याचे तालुका वैद्यकिय अधिकारी राधेशाम पाचे यांनी सांगितले.