मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या… शेतकरी गाव गहाण ठेवणार !

0
21

मुंबई(शाहरुख मुलाणी),दि.15 – राज्यात ०५ वर्षात १२ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत असे सेवाग्राम संघटनेने दावा केला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने कर्जमाफीचे पॅकेज जाहीर केले पण ही तुष्ट्पुंजी मदत ही कर्जबाजारी शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने सरकारचा निषेध करत उस्मानाबाद जिल्हातील उमरगा तालुक्यातील कवठा ग्रामसभेने शेतजमीन आणि आपली घरे गहाण ठेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
१६ ऑक्टोबर रोजी जमिनींचे व आपल्या घराचे ७/१२ व गहाण खत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाधीन करणार असल्याचे शेतकरी विनायक पाटील यांनी दिली आहे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर १६ ऑक्टोबर रोजी अख्ख गाव मंत्रालय समोर रस्ता रोको करून सरकारचा निषेध करणार आहे, असे सांगितले. गेली ०४ महिने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या या फसवणुकीच्या संदर्भात लातूर किल्लारी येथे आमरण उपोषण सुरु केले असता जिल्हाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले कि, मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊ ? पण मुख्यमंत्र्यांनी अद्याप भेट व आमच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या पिकाचा हमीभावाचा तपशील तयार केला होता. शेतमाला सरकारने जाहीर केलेला हमीभाव भात, ज्वारी, सोयाबीन, उडीद, कापूस, मुग यांचा जो हमीभाव आहे तो कमी आहे. आणि कृषी विद्यापीठाने काढलेला उत्पादन अधिक आहे. अर्थात यात खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जो हमीभाव मिळाले पाहिजे तो मिळत नाही आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार ला कंटाळून शेतकरी चक्क गावच गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.