भंडारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी यशवंत सोनकुसरे

0
11

भंडारा,दि.15ः- गणेशपूरचे माजी उपसरपंच यशवंत सोनकुसरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या आदेशान्वये तथा प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या मान्यतेचे व संग्राम काते पाटील यांच्या सहीचे पत्र तुमसर येथील राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात खा. प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते देण्यात आले. यशवंत सोनकुसरे हे मागील १५ वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी आपली राजकीय कारकिर्द राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसपासून सुरू केली. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव व तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसमध्ये जिल्हा महासचिव व तालुका अध्यक्ष या पदावरसुद्धा काम केले आहे. त्यांनी नियुक्तीचे श्रेय माजी आ. राजेंद्र जैन, खा. मधकर कुकडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्षसुनील फुंडे, संचालक कैलाश नशिने, राकाँ जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, राकाँ जिल्हा महासचिव विजय डेकाटे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. श्रीकांत वैरागडे, माजी सभापती नरेश डहारे, जि. प. उपाध्यक्ष नरेंद्र कुझ्रेकर, जि. प. सभापती धनेंद्र तुरकर, रेखा ठाकरे व कार्यकर्त्यांना दिले आहे