मंदिर समितीच्या जागेवर जेएमसी कपंनीचे अवैध बांधकाम

0
12
कृषक जागेवर पक्के बांधकाम,शासनाचा कर बुडविला
मधुकर हेडाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी
लाखनी,दि.15ः- येथील मारोती देवस्थान गुजरी चौक, लाखनी येथील मंदिर समितीच्या १० एकर जमिनीवर जे एम सी उड्डाणपूल बांधकाम करणाऱ्या कम्पनीचा अवैध ताबा करण्यात आला आहे.  स्व. भिवराबाई गणपती शेटे भांडारकर यांनी १९६७ ला मृत्यू पत्रात मंदिर समितीला १० एकर जमीन दान केली होती. आजवर या शेतीतून मंदिर समितीला उत्पन्न मिळत होते आणि त्यातून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत होते. या मंदिर समितीची जागा लाखनी येथील व्यापारी मधुकर गणपत हेडाऊ यांनी जून २०१८ ला कोणत्याही समिती सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात न घेता ४ लाख पन्नास हजार रुपयांना लीजवर देण्यात आली. मंदिर समिती ही धर्मदाय असल्यामुळे धर्मदाय आयुक्त यांची परवानगी घेणे आवश्यक होते परंतु त्याबाबद कुठलीही परवानगी घेतली नाही. लीज करार एकट्या मधुकर गणपत हेडाऊ यांनी केला त्यातून मिळणाऱ्या पैश्यांचा गैरव्यवहार झाला असे ग्रामस्थांनी यावेळी भंडारा येथील पत्र परिषदेत सांगितले.
लाखनी येथे सध्या उड्डाणपूल बांधकामासाठी मंदिराच्या जमिनीचा वापर होतो आहे, जमीन कृषक असतांना तलाठी लाखनी यांनी पडीत जमीन असल्याचा सातबारा मधुकर हेडाऊ यांच्या मार्फत कंपनीला देण्यात आले तसेच लीज करार करून देत असतांना रजिस्टर्ड अधिकारी यांच्या कडून करार करून घेणे अपेक्षित होते मात्र ते तसे केले नाही. याउपरही तहसीलदार लाखनी यांनी सहा महिन्यासाठी जागा अकृषक करून दिली आहे आणि अपेक्षित दंड कंपनी मार्फत वसूल केला आहे, नगरपंचायत लाखनी यांची परवानगी न घेता त्याच जागेवर पक्के बांधकाम केले जाते आहे त्यामुळे पूर्णतः या कंपनीद्वारे मोठ्याप्रमाणात गैरकारभार सुरू आहे याबाबत नागरिक त्रस्त झाले आहेत. मंदिर समितीच्या जागेवर केलेला अतिक्रमण कम्पनी ने पूर्ववत करावा, मधुकर हेडाऊ यांनी जमीन लीज करतांना गैरव्यवहार केला त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी असे यावेळी पत्रपरिषदेत विकास खेडीकर, ऍड कोमलदादा गभणे, नगरसेवक कौस्तुभ भांडारकर, जगदीश भदाडे, अमर भिवगडे, नारायणराव खेडीकर, गजानन भदाडे, बालू भदाडे, गणेश पंचभाई आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.