डोंगरगाव दुष्काळ यादीत समाविष्ट करा : सरपंच वैरागडे

0
21
●दुष्काळ झळांमुळे डोंगरगाव पडले ओस
मोहाडी(नितिन लिल्हारे)दि.15 :  जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची हजेरी लागल्याने निर्माण झालेल्या दुष्काळ झळांमधून सावरण्यासाठी मजूर स्थलांतराचा मार्ग निवडत आहेत़. दरदिवशी स्थलांतराचा हा वेग वाढत असून गावे ओस पडत आहेत़. मोहाडी तालुक्यातील व डोंगरगाव येथे सतत तीन वर्षांपासून दुष्काळ पडत असल्याने गावातून रवाना झाल्याची लोकसंख्येच्या टक्केवारीत वाटत आहे.
मोहाडी तालुका दुष्काळ यादीत नावापुरताच समाविष्ट आहे का अशा प्रश्नन शेतकऱ्यांना पडला आहे. सतत तीन वर्षांपासून डोंगरगावत दुष्काळाचे चित्र दिसत आहे यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे धानपीक वर्णिला लागले आहे, बहुतेक शेतकऱ्यांने गाई म्हशीच्या चारा करत धानपीक कापले जात आहे. तर काही शेतकऱ्यांना रोगराईला आमंत्रण दिले आहे. त्यामुळे डोंगरगाव दुष्काळ यादीत समाविष्ट करा अशी मागणी सरपंच वैरागडे यांनी केली आहे.
डोंगरगाव दुष्काळ यादीतून बसत असून नाव वळगण्यात आले, तर ज्या गावात पाण्याचा पुरापूर आहे अशा गावांना दुष्काळ यादीत समाविष्ट केले आहे ज्या गावात बावणथंडी धरणाचे पाणी पोहचत नाही आणि त्या गावांना पाण्याची साधन नाही अशा गावांना डावलण्यात आले. रोडाने पाहले तर धान पीक हिरवा दिसतो, आणि आत मध्ये गेले तर तणस दिसून येते, सर्वेकरणाऱ्या अधिकाऱ्यांनी गावकरी व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. मोहाडी तालुका दुष्काळ घोषीत झाले असून मोजक्याच शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार का?डोंगरगावात यंदाही  दुष्काळी स्थिती असल्याने मजूरांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आह़े एकीकडे दुष्काळी स्थितीमुळे शेतशिवार ओस पडले आहे. जर डोंगरगाव दुष्काळ यादीत सामाविष्ट केले नाही तर तहसिल कार्यालय मोहाडी यांच्या समोर उपोषणाला बसण्याचा ईशारा सरपंच नरेश वैरागडे, उपसरपंच प्रभाकर समरीत, ग्रा.प. सदस्य बंटी मिश्रा, गुणवंत शाहूसाखरे, राजेंद्र मेहर, शीतल सेलोकर, किरण सेलोकर, सीमा मानकर, शाहू लांजेवार, अनिता अमिलडोके, आत्माराम खराबे, प्रकाश कुंभलकर, धनराज खेडकर, हिरालाल समरीत, बाबुराव शाहूसाखरे,उत्तम गभणे, अरुण समरीत, जीवन भोंडे, नामदेव समरीत व समस्त शेतकऱ्यांनी दिला आहे