ऑटो उलटून एका विद्यार्थ्यांचा मृत्यु, आठ जखमी

0
7

यवतमाळ दि.१६:: राळेगाव तालुक्यातील आष्टा येथे ऑटो उलटून एक विद्यार्थी ठार झाला असून 8 विद्यार्थी जखमी झाले. ही घटना मंगळवारी (ता. १६) सकाळी सातदरम्यान घडली. मोहित अमर पिंपळकर (वय १३) असे मृताचे नाव आहे. तो मूळचा मरेगाव तालुक्यातील गोटमार बोरी येथील रहिवासी असून आष्टा येथे आजोळी राहत होता.आष्टा येथून राळेगावला आटोने विद्यार्थी शिकायला येतात. तो न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये सातवीत शिकत होता. सात जखमी विध्यार्थ्यांना यवतमाळला हलविण्यात आहे. वैष्णवी उरकुडे, रोशनी गडमडे, लखन खंडारे, शिवा भोरे, गायत्री जळेकर, अनुजा बोन्द्रे, श्रवण भोरे व सानिया तोडसे यांना किरकोळ मार लागला असून त्यांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ऑटोत 18 विदयार्थी असल्याचे सांगण्यात आले.