शासनाच्या विभिन्न योजनेचा लाभ सफाई कामगार पर्यंत पोहचवावे : हाथीबेडे

0
14

गोंदिया,दि.१६ः: भारताचे पंतप्रधान यांनी “ स्वच्छता ” चे मुलमंत्र घेऊन संपूर्ण देशात स्वच्छता मोहिम राबविली आहे. परंतु  स्वच्छता करणारा सफाई कर्मचारी शासनाच्या विविध योजनेपासून वंचित आहे. त्यांच्या विविध समस्या मार्गी लावणे हे आपले पहिले कर्तव्य असल्याचे मत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा सभेत व्यक्त केले.
या वेळेस प्रामुख्याने जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी, उप अधिक्षक गृह सोनाली कदम, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, निवडणूक उपजिल्हिाधिकारी शुभांगी आंधळे, मुख्याधिकारी नगर परिषद चंदन पाटिल तसेच विविध विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.
सदर बैठकीत मागील बैठकीच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या वेळेस हाथीबेळे यांनी विभागनिहाय सफाई कामगारांची संख्या व समस्यांची माहिती घेतली. तसेच सफाई कर्मऱ्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर ऊंच व्हावा या करीता प्रशासनाने नेहमी प्रयत्नशील राहण्याचे सांगितले. या ठिकाणी त्यांनी पत्रकारांशी चर्चा करताना सांगीतले की कर्मचारी भर्तीमध्ये ठेका पध्दतीचा त्यांचा विरोध असून किमान वेतन प्राप्त करण्याचा अधिकार सर्व कामगारांना आहे. तसेच राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा उद्दीष्ट सफाई कामगारांची विविध समस्या मार्गीलावून त्यांचे कल्याण करण्याचे त्यांनी सांगीतले .
42 सफाई कामगारांची कालबध्द  पदोन्नती
मुख्याधिकारी नगर परिषद गोंदिया यांच्या आढावा सभेत माहिती दिली की न.प. गोंदियाने 42 सफाई कामगारांना कालबध्द  पदोन्नती दिली आहे. तसेच सफाई कामगारांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करुन स्वास्थ्य सेवा पुरविण्यात आली आहे. कामाच्या वेळेस उपयोगी पडणारे साहीत्य गणवेश, हातमोजे (हैंडग्लोब्ज), मॉस्क, रेनकोट, गंगबूट आदि उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच सफाई कर्मचाऱ्यांसाठी शिबीर आयोजीत करुन शासनाच्या विविध योजनेचा लाभ त्यांच्या पर्यंत पोहचविण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.