मुख्य बातम्या:

मॉडेल कॉन्व्हेंटमध्ये वाचन प्रेरणा दिन

गोरेगाव दि.१६ः: स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट अँड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शाळेचे संस्थापक  आर. डी. कटरे यांच्या अध्यक्षतेत  तसेच शाळेचे प्राचार्या श्रीमती सी. इ. चंद्रिकापुरे याच्या प्रमुख उपस्थितीत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाप्रसंगी आर डी कटरे यांनी डॉ अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्राचार्य यांनी सुद्धा कार्यक्रमाच्या माध्यमातून विध्यार्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विध्याथ्र्यांना वाचनाचे महत्व संमजवण्यात आले व विध्याथ्र्यांकडून पुस्तकाचे वाचन करण्यात आले. विध्याथ्र्यांना स्वच्छतेची जाणीव करून देण्यात आली व हात धुवा दिन साजरा करण्यात आला.
सर्व विद्याथ्र्यांना स्वच्छतेकडे लक्ष देत आपल्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखण्यास मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वीरीत्या पार  पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग,  विध्यार्थी व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Share