अखेर सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलावर अंत्यसंस्कार……

0
31
आंदोलनादरम्यान पोलिसासंह बसेसवर दगडफेक
गोंदिया-कोहमारा मार्गावर रास्ता रोकोमुळे वाहतुक विस्कळीत
डॉ.लिल्हारेसह ७ ते ८ जणांना पोलीसांनी घेतले ताब्यात
गोंदिया दि.१६ः: सर्प दंशाने मृत्यू झालेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा करणाèया दोन आयुर्वेदिक डॉक्टरांसह तिघांना गोरेगाव पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले. यामुळे घोटी येथील नागरिकांमध्ये रोष निर्माण होऊन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या डॉक्टरांना त्वरीत सोडण्यात यावे, या मागणीसाठी नागरिकांनी आज गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला व गोंदिया-कोहमारा मार्गावर चक्काजाम आंदोलन केले.यामुळे गोरेगाव येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.सकाळी १० वाजेपासून सुरु असलेल्या आंदोलनातील आंदोलकांना दुपारी २ वाजेच्या सुमारास दगडफेक केल्याने पोलिसांनी सौम्यलाठीमार करीत पांगविले.
आंदोलकांनी त्रीव भूमिका घेत दगडफेक केली.या दगडफेकीमध्ये एका युट्युबचॅनलच्या पत्रकाराला दगड लागल्याने त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.वरिष्ठ पोलीस अधिकारी,मृत मुलाची आई व नातेवाईकांसह उपचार करण्यासाठी आलेल्या डॉक्टरामध्ये गोरेगाव पोलीस ठाण्यात झालेल्या चर्चेनंतर मुलाच्या आईने शवविच्छेदन न करता अंत्यसंस्काराला समंती दर्शविल्यानंतर घोटी येथील स्मशानभूमीत त्या मुलावर चोख बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान या प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या डाँक्टरासंह पोलीसावर व राज्यपरिवहन मंडळाच्या बसवर दगडफेक करुन शासकीय मालमत्तेचे नुकसान करुन वाहतुक विस्कळीत केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याच्या प्रकियेलाही सुरवात करण्यात आली आहे.दरम्यान पोलिसांनी डॉ.नवीन मोहनसिंह लिल्हारे (रा.कटंगी सेवाधाम),गुनेश लिल्हारे (कटंगी) व इंद्रकुमार बघेले (म्हसगाव) यांच्याविरुध्द महाराष्ट्र नरबळी कायद्याच्या कलम 3 अन्वये गुन्हा नोंदविला असून याप्रकरणात ५ ते ६ युवकांनाही ताब्यात घेतले आहे. 
गोरेगाव तालुक्यातील घोटी येथील आदित्य गौतम या आठ वर्षीय बालकाचा सर्प दंशाने रविवारी मृत्यू झाला. बाई गंगाबाई रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले.दरम्यान बालघाट येथील आयुर्वेदिक डॉक्टर नवीन लिल्हारे यांनी सर्प दंशाने मृत्यू झालेल्या बालकाला २४ तासात जिवंत करण्याचा दावा केला. यासाठी बालाघाटावरुन ते आपल्या दोन सहकाèयांसोबत गोरेगाव येथे सोमवारी रात्री उशीरा पोहोचले. मात्र एकदा मृत्यू झालेला व्यक्ती परत जिवंत होत नसून हा अंधश्रध्दा निर्माण करणारा प्रकार असल्याचे अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या पदाधिकार्यांनी पोलिसांना सांगितले. गोरेगाव पोलिसांनी डॉ. लिल्हारे व दोन जणांना सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास ताब्यात घेतले. त्यामुळे त्यांना घोटी येथे पोहोचता आले नाही. वास्तविक डाॅ.लिल्हारे यांनी पोलिसांना याप्रकरणी मदत मागितल्याचेही आता समोर येत आहे.आणि सर्पदंशाने आधीच मृत्यू झालेला असताना नरबळी अंतर्गत गुन्हा दाखल कसा काय करण्यात आला हा प्रश्न चर्चेचा झाला असून ज्या बाई गंगाबाई रुग्णालयात तो बाळ दगावला.त्या रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकार्यांनी उत्तरीय तपासणी का केली नाही असे अनेक प्रश्न आत्ता निर्माण होऊ लागले आहेत.
पोलिसांनी डॉ.लिल्हारे यांना घोटी येथे पोहोचू दिले नाही, त्यामुळे बालकाचे प्राण वाचविता आले नाही असा आरोप करीत घोटी येथील नागरिकांनी आज मंगळवारला सकाळी गोरेगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. तसेच गोंदिया-कोहमारा मार्गावर टायरची जाळपोळ करुन रास्ता रोको आंदोलन केले. गोरेगाव येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.गोरेगावातील सर्व बाजारपेठ बंद होती.जुना बसस्थानक ते दुर्गा चौक परिसरात टायरची जाळपोळ करण्यात आली.तसेच गोंदिया-माहूर या बसेसवर व पोलिसावर दगडफेक करण्यात आली.
वातावरण चिघळत असल्याचे बघत अतिरिक्त पोलीस अधिक्षक संदिप आटोळे यांच्या नेतृत्वात गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते,आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्यासह गोरेगाव,गोंदिया ग्रामीण,रामनगर आदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाèयांनी गोरेगावात तळ ठोकून स्थिती नियंत्रणात आणणयाचे प्रयत्न केले.आंदोलक युवक,महिला पुरुष मात्र पोलिसांच्याविरोधात नारेबाजी करीत मुलावर उपचार करण्यासाठी डॉक्टरला सोडण्याची मागणी करीत होते.पोलिसांनीही आंदोलकांना शांत होण्याचे आवाहन केले.तसेच गोेरेगावचे तहसिलदार कल्याणकुमार डहाट व पोलिस निरीक्षक बोरकर यांच्या वाहनाला अडवून त्यांना घेराव घालणाèया युवकांना ताब्यात घेण्यास सुरवात केली.
सर्पदंशाने मुलाचा मृत्यू झाला असून त्यास घरी परत आणण्यात आल्याची माहिती घोटीसह गोरेगावातील दुर्गा चौकात पसरली.दरम्यान दुर्गा चौकात ही चर्चा सुरु असतांना म्हसगाव निवासी इंद्रकुमार बघेले यांना एका इसमाने माहिती दिली.तेव्हा बघेले यांनी बालाघाट जिल्हतील कटंगी येथील डॉ.लिल्हारे यांना सर्पदंशाने एका मुलाचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती दिली.त्या माहितीच्या आधारे डॉ.लिल्हारे यांनी सोमवारला गोरेगाव येथे पोचून त्या मुलाला बघितले आणि मी रात्री १२ वाजेपासून उपचार सुरु करेन मला २४ तास द्या असे सांगत मुलाच्या शरीरावर काही ठिकाणी ब्लेडने चिरा मारण्यास सांगितले.चिरा मारल्यानंतर रक्त निघाल्याने उपचार होऊ शकतो असे लिल्हारे यांनी सांगितल्याने मुलाच्या नातेवाईकांनी मुलावर अंत्यसंस्कार न करताच मृतदेह घरी नेले.रात्री उपचार करण्यासाठी डॉक्टर येणार अशी वाट बघत नातेवाईक व गावकरी बसले मात्र त्यापुर्वीच पोलिसांना सदर प्रकरणाची माहिती मिळाल्याने त्यांनी आधी म्हसगाव निवासी इंद्रकुमार बघेले यांना ताब्यात घेतले.त्यानंतर डॉ.लिल्हारे व त्यांचा सहकारी गुनेश लिल्हारेला रात्री ११.३० वाजता ताब्यात घेत गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात चौकशीकरीता ठेवले.सकाळपर्यंत डॉक्टर न आल्याने गावकरीही शांतच होते.मात्र जेव्हा गावकरी व नातेवार्इंकाना डॉक्टराला पोलिसांनी रात्रीच पकडले असे कळताच त्यांनी हंगामा करण्यास सुरवात करीत आंदोलन केले.
मी काही चमत्कार करणार नाही. हा आयुर्वेदिक उपचार करणार आहे. सर्पदंशानंतर रुग्ण सात दिवसांपर्यंत समाधी अवस्थेत राहतो. आयुर्वेदिक उपचाराने बरा होऊ शकतो. हीच उपचार पद्धती या मुलावर करणार आहे, अशी माहिती मध्य प्रदेशातील कटंगी येथील सेवाधाममधील आयुर्वेदिक डॉक्टर नवीन मोहनसिंह लिल्हारे कटंगी सेवाधाम यांनी सोमवारला दिली होती.त्यानंतर मात्र आज पोलिस ठाण्यात आपणास मुलाचे शरीर फुगल्याचे व नाकातून रक्त निघत असल्याची माहिती कुणीच दिली नाही असे सांगत ती माहिती दिली असती तर आपण मुलाला वाचवू शकतो असे म्हटलेच नसते असे पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर आली आहे.विशेष म्हणजे डॉ.लिल्हारे हे वैद्य नसून मध्यप्रदेशातील भोपाळ येथील बरकतुल्ला विद्यापीठातून बीएएमएसची पदवी घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत.ते गेल्या काही वर्षापासून आपल्या भागात आयुर्वेदिक औषधोपचार करीत आहेत.
गोरेगाव येथील आंदोलनातील परिस्थिती नियंत्रणात असून गोंदिया-कोहमारा मार्गावरील विस्कळीत वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली आहे. तर ज्या डाॅक्टरामुळे हे वातावरण बिघडले.त्या डाॅक्टरासह काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या घोटी व गोरेगाव येथील परिस्थिती शांतीपूर्ण असून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती गोरेगावचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी दिली आहे.त्यासोबत सर्पदंशाने मृत झालेल्या बालकाचे शव विच्छेदन करण्यास कुटुंबियांनी नकार देत अंत्यसंस्कार केल्याची माहिती गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी दिली.