अनैतिक संबंधातून संखला तरुणाचा खून

0
10

जत, (राजेभक्षर जमादार ),दि.17-अनैतिक संबंतातून जत तालुक्यातील सिद्धगोंडा परगोंडा बिराजदार (वय 25, रा. संख) या तरुणाचा धारदार शस्त्राने निघृण खून झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. याप्रकरणी संशयीत आरोपीला अवघ्या दोन तासात अटक करण्यात उमदी पोलिसांना यश आले आहे.अटक करण्यात आलेल्या संशयीताचे भरमाप्पा बिराप्पा करजगी असे आहे.

याबाबत घटनास्थळ आणि उमदी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत सिद्धगोंडा याचे शेजारीच राहणार्‍या भरमाप्पाच्या पत्नीशी गेल्या पाच वर्षांपासून अनैतिक होते. वारंवार स्वत: भरमाप्पा आणि लोकांच्या मध्यस्थीने सिद्धगोंडाला सांगूनही त्याने त्याच्या पत्नीशी असलेले संबंध तोडले नाहीत. यावरून दोघांत अनेकदा वादावादीही झाली आहे. उलट आरोपीस अनेक मार्गाने त्रास देत होता. त्यामुळे तो वैतागलेला होता. त्यातच त्याची पत्नीही त्याच्यासोबत राहत नव्हती. ती माहेरी राहत होती. याचा राग धर्माप्पाच्या मनात होता.

 नवरात्र उत्सवानिमित्त गावात कन्नड नाटक होते. ते पाहून मंगळवारी पहाटे सिद्धगोंडा हा संख मध्यम प्रकल्पाजवळ असलेल्या आपल्या घरी आला. जुन्या घरात वडील, भाऊ झोपलेले होते. त्यांना पहाटे न उठवता तो शेजारी बांधकाम सुरू असलेल्या खोलीत झोपला. या घराला अद्याप दारे-खिडक्या लावण्यात आलेले नाहीत. पहाटे तो झोपी गेल्यावर त्याच्यावर पाळत ठेवून भरमाप्पाने धारदार शस्त्राने मानेवर वार करून खून केला. सिद्धगोंडा हा गाढ झोपेत असल्याने त्याला प्रतिकार करता आला नसावा, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. सकाळी सिद्धगोंडा यांच्या वडिलांना आपल्या मुलाचा खून झाल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी अधिक चौकशी करता त्यांना भरमाप्पावर संशय आला. भरमाप्पाने यापूर्वी सिद्धगोंडाच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे उमदीच्या पोलिस पथकाने तातडीने त्याचा तपास सुरू केला. तो अवघ्या दोन तासात सापडला. संशयीत आरोपी भरमाप्पास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे व पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सपांगे यांनी ताब्यात घेऊन अधिक तपास सुरू केला आहे.दरम्यान, भरमाप्पाने आपणच खून केला असल्याची कबुली दिली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मिष्ठा वालावलकर यांनी भेट दिली व पुढील तपासाचे आदेश दिले.