मुख्य बातम्या:

पांजरा येथे ओबीसी जनजागृती कार्यक्रम उत्साहात

गोंदिया,दि.१७-तालुक्यातील पांजरा येथे नवदुर्गा उत्सवादरम्यान ओबीसी समाजाची दशा व दिशा याविषयावर समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन सोमवारला करण्यात आले होते.यावेळी ओबीसी समाजावर देश स्वातंत्र्य होऊन ७० वर्षाचा काळ लोटल्यानंतरही कशाप्रकारे अन्याय अत्याचार शासन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे याची सविस्तर माहिती देण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चेतनदास नागपूरे होते.तर मार्गदर्शक म्हणून ओबीसी संघर्ष कृती समतीचे मार्गदर्शक व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे,ओबीसी संघर्ष कृती समिती विद्यार्थी आघाडी अध्यक्ष दिपक बहेकार,महासचिव शिशिर कटरे,ओबीसी सेवा संघाचे प्रेमेंद्र चव्हाण उपस्थित होते.त्याचप्रमाणे विचारमंचावर रमण लिल्हारे उपसरपंच ,रमेशजी नागपूरे अध्यक्ष म.गां.तं.मु.स.ललीत नागपूरे अध्यक्ष शा.व्य.स.मनमोहन श्रीवास पोलिस पाटिल .खेमलाल सुलाखे , फागुजी मेश्राम , गेंदलाल कापसे ,केशोराव कापसे, टेकराम नागपूरे,रामरतन गणवीर,राजरतन गराडे,सौ.गीताबाई मस्करे दारुबंदी महिला सदस्य प्रामुख्याने उपस्थित होत्या.यावेळी बोलतांना खेमेंद्र कटरे यांनी ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत कलम ३४० लिहून हक्क अधिकार दिलेले आहेत.ते हक्क अधिकार मिळवून घेण्यासाठी ओबीसी समाजाला संघर्षाशिवाय पर्याय नाही.सोबतच जोपर्यंत आपली जनगणना होत नाही तोपर्यंत ओबीसी समाजाच्या विकासाठी योजना तयार होऊ शकणार नाही करीता जनगणना करण्यात यावी यासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून सरकावर दबाव आणण्याचे आवाहन केले.दिपक बहेकार यांनी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शनावर सविस्तर माहिती देत इंग्रजीची भिती मनातून ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांनी काढून अभ्यासाचे नियोजन करावे असे आवाहन केले.यावेळी पेमेंद्र चव्हाण यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद बघेले यांनी केले.कार्यक्रमाला मोठ्या संख्यने नागरिक उपस्थीत होते.
Share