बनावट दारू अड्डय़ावर छापा

0
14

भंडारा, दि.१७ः-शहरातील राजगुरू वार्डात सुरू असलेल्या बनावट विदेशी दारू तयार करणार्‍या अड्डय़ावर राज्य राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मंगळवारी धाड टाकून दोन आरोपींसह १ लाख ३ हजार १७0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सौरव राजू बोरकर (२४) रा. गांधी वार्ड छोटा बाजार व अमित मनोहर निनावे (३0) रा. राजगुरू वार्ड, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
राजगुरू वार्ड येथे बनावट विदेशी दारू तयार करण्यात येत असल्याच्या माहितीवरुन उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मनोहर निनावे यांच्या घरी धाड घातली असता सौरव बोरकर व अमित निनावे हे बनावट दारू तयार करताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून मध्य प्रदेश राज्यात निर्मित व विक्रीस असलेली ६५0 मिलीच्या २५ सिव्हर जेट व्हिस्कीच्या बॉटल्स, १८0 मिलीच्या बनावट इपेंरियल ब्ल्यू व्हीस्कीच्या बॉटल्स, रॉयल स्टॉगच्या ६0 बॉटल्स,, नं. १ च्या १४0 तसेच ऑफीसर चॉईस ब्लू व्हीस्कीच्या १७0 बॉटल्स व १ हजार ६00 झाकण, कॉक, बुच आणि दारू बनविण्याचे इतर साहित्य असा एकूण १ लाख १ लाख ३ हजार १७0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रभारी निरीक्षक पी. डी. घरटे करीत आहेत.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त अश्‍विनी जोशी, संचालक सुनिल चव्हाण, उपआयुक्त उषा वर्मा, भंडारा अधीक्षक शशिकांत गज्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक पी. डी. घरटे, दुय्यम निरीक्षक सुषमा कुंभारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अरविंद कोटांगले, जवान हेमंत कांबळे, विनायक हरिणखेडे, विष्णू नागरे, संजय कोवे, नरेंद्र कांबळे यांनी केली.