पालांदूर येथे गुरुवारला जनजागृती मेळावा

0
10
भंडारा,दि.17 : जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्पेâ पालांदूर येथे उद्या १८ ऑक्टोंबर रोजी दुपारी २ वाजता जनजागृती मेळावा तसेच एटीएमचे उद्घाटन बँकेच्या शाखेमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. मधुकर कुकडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा किसान खेत मजुर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती लाभणार आहे. तर विशेष अतिथी म्हणून साकोली विधानसभा क्षेत्राचे आ.राजेश (बाळा) काशीवार, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, बँकेचे पालक संचालक तथा जि.प. सदस्य विनायक बुरडे, यांची उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख उपस्थिती मध्ये माजी उपाध्यक्ष जि.प. भंडाराचे तुरा भुसारी, सामाजिक कार्यकर्ता ईद्रीसभाई लद्दानी, माजी जि.प. सदस्य भरत खंडाईत, पंचायत समिती सदस्य विजू कापसे, प.स. सदस्या सौ. वंदना गवळे, माजी पं.स. सदस्य धनंजय घाटबांधे, सरपंच जितेंद्र पुरेकार, उपसरपंच हेमराज कापसे, सरपंच (कवलेवाडा) केसव बडोले, (किटाळी) सरपंच सौ. प्रिती गेडाम, (खराशी ) सरपंच सौ. अंकिताबाई झलके तसेच (जेवनाळा ) सरपंच सौ. वैशाली बुरडे हे राहणार असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त गावकर्‍यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँक पालांदूर शाखेच्या  कर्मचार्‍यांनी केले आहे.