शिवसेनेची एसडीओ कार्यालयावर धडक, थेट अनुदान धोरणाचा विरोध

0
11

देसाईगंज, दि.१७: राज्य शासनाच्या थेट अनुदान धोरणाचा विरोध म्हणून आज शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांच्या आदेशानुसार, उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम व तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत बन्सोड यांच्या नेतृत्वात येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली.

डीबीटी योजना बंद करण्यात यावी, शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातूनच धान्य वाटप करण्यात यावे, ग्रामीण भागातील गॅसधारकांनाही केरोसीन देण्यात यावे इत्यादी मागण्यांचे निवेदन एसडीओमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. थेट अनुदान योजना(डीबीटी) सुरु केल्यास संपुर्ण शिधापत्रिकाधारक व शिवसैनिक रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करतील, असा इशारा यावेळी अविनाश गेडाम व डॉ.श्रीकांत बन्सोड यांनी दिला. यावेळी विभागप्रमुख अशोक माडावार, उपशहरप्रमुख विकास प्रधान, लीलाधर भर्रे, अरुण कुंभलवार, वासुदेव दुफारे, सुदेश दुनेदार, मुखरु कुथे, अरविंद कुथे, रवी हेडाऊ, योगेश बुल्ले, बुवाजी मेश्राम, रवींद्र भिलकर, किशोर बन्सोड, वामन पगाडे, आसाराम मडावी, गोलू झिलपे, दिनकर गजभिये, विष्णू नाकाडे, श्यामराव ढोरे, शंकर बारापात्रे, शंकर जोहरी, उमाजी कुथे, बंडू दोनाडकर, सुनीता मडावी, अल्का रामटेके, सुमन मालोदे, मीरा कोहपरे, ईश्वर शेंडे, शशिकला शेंडे, निशा निकुरे, जोत्स्ना निकुरे, वनिता आठवले, पद्मा कोडापे, तोरेश्वरी गेडाम, पार्वता शिवरकर, कल्पना बोबडे, प्रतिभा गेडाम, सुनंदा शेंडे, निवृत्ता गजभिये, शीला ठवरे, मंगला उईके, रत्नमाला ठवरे, लालाबाई गजभिये, ज्योती ठवरे, देवांगणा गजभिये, सुमन रामटेके, वनमाला ठवरे, प्यारेलाल रामटेके, अंतकला शेंडे, ताराबाई गजभिये उपस्थित होते.