तिकीटांच्या पैशांचा अपहार, रेल्वेला कर्मचाऱ्यांनी लावला कोट्यवधींचा चुना

0
10

नांदेड(नरेश तुप्टेवार),दि.17ः-भारताततील प्रसिद्ध असलेल्या गुरू गोविंदसिंघ यांच्या पवित्र भूमी हुजूर साहेब नांदेड येथील रेल्वे स्थानकावरील टिकीट विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्याने दीड कोटींचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबधित क्लार्कविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून प्रवाशांच्या पैशांचा अपहार केल्याने रेल्वे कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे.याप्रकारे अजून काही घोटाळे केले गेले आहेत काय याची चौकशी रेल्वे पोलीसांनी सुरु केली आहे.

हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 वरील तिकीट विक्री करणारा कर्मचारी करुणाकरण व त्याच्या दोन साथीदारांनी मागील 15 दिवसात प्रवाशांकडून आलेल्या तिकीटांची रक्कम बँकेत भरलीच नाही. ही रक्कम जवळपास 1 कोटी 40 लाख रुपये असल्याचे प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे. ही रक्कम या कर्मचाऱ्यांनी जुगारामध्ये गमावल्याचे ते सांगत आहेत. दीड कोटीचा अपहार उघडकीस आल्याने रेल्वे विभागात खळबळ उडाली असून, दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा व त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद येथील मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी देखील त्याठिकाणी पोहचले आहेत. रेल्वे पोलिसात यासंदर्भात गुन्हा नोंदीची प्रक्रिया सुरु झाली आहे