रोगनिदान शिबिरात ४५० रुग्णांची तपासणी

0
11

गोरेगाव,दि.17 : श्री क्षेत्र सूर्यादेव मांडोबाई येथे सुर्यादेव मांडोबाई समिती आणि विदर्भ इ्स्टिटट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या संयुक्त विद्यमाने रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेे. या शिबिरात ४५० रुग्णांची तपासणी करण्यात आली.संस्थेतर्फे सलग २५ वर्षांपासून मोतीबिंदू तपासणी करण्यात येते. मागील १६ वर्षात तब्बल १८०० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली तर १४ हजार चष्मे वाटप करण्यात आले. ४५० रुग्ण हृदयविकार या भयावह रोगाने ग्रस्त मिळाले असता ज्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नाही अशा २४ रुग्णांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. .

यावेळी संस्थेचे सचिव विनोद अग्रवाल म्हणाले, असे बरेच रोग आहेत ज्याची माहिती रुग्णाला मिळत नाही आणि जेव्हा मिळते तेव्हा खूप वेळ होऊन गेलेली असते. पैशाअभावी रुग्ण बरा होऊ शकत नाही. शेवटी त्याला आपला जीव गमवावा लागतो. हे सर्व घडू नये म्हणून वेळोवेळी शरीराची तपासणी होणे गरजेचे आहे आणि म्हणूनच मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांची सांगितले. व्हिम्सतर्फे डॉ. सुरेश चौरे यांनी जनसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. जनसेवेसाठीच संस्थेची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रोगनिदान शिबिरात ४५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील २७ रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया ज्यात १६ हृदयशस्त्रक्रिया आणि ११ इतर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या वेळी डॉ. नितीन खंडेलवाल, डॉ. हरिशंकर गुप्ता, डॉ. आशिष बदखल, डॉ. प्रफुल्ल बोरकर, डॉ. निलय हांडे, डॉ. विवेक अग्रवाल आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी भैयालाल सिंदराम, विनोद अग्रवाल, विश्वनाथ असाटी, कुसन घासले, सीताराम अग्रवाल, डॉ. लक्ष्मण भगत, सदस्य सखाराम सिंदराम, शालिकराम उइके, गणपतलाल अग्रवाल, नंदकिशोर गौतम, डॉ. जितेन्द्र मेंढे, हुकुमचंद अग्रवाल, पंडित अयोध्यादास पुजारी, व्यवस्थापक प्रेमलाल धावडे, श्यामराव ब्राह्मणकर, रोशन मडावी, शिवा सराठे, योगराज धुर्वे यांनी परिश्रम घेतले..