बिरसीवासीयांचे ३२ एकरात होणार पुनर्वसन

0
11

गोंदिया,दि.१८ःःअनेक वर्षांपासून बिरसी विमानतळ प्रकल्पामुळे विस्थापित होणार्‍या नागरिकांनी पुर्नवसनाची मागणी प्रशासनाकडे रेटून धरली. अखेर या मागणीला न्याय देत विमानतळ प्रशासन लवकरच विस्थापित नागरिकांचे पुर्नवसन करण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यासाठी बिरसी गावाजवळील विमानतळ प्रशासनाच्या राखीव असलेल्या ३२ एकर जागेची निवड झाली आरहे. कायदेशीर बाबींची पुर्तता करून या जागेवर लवकरच पुनर्वसनाच्या कामाला सुरूवात होणार आहे. अश््री माहिती बिरसी विमानतळ प्रकल्पाचे मुख्य विमानपत्तन संचालक सचिन खंगार यांनी दिली.
सन २00७ मध्ये जिल्ह्यातील बिरसी येथे विमानतळ प्रकल्पाला सुरूवात करण्यात आली. त्यासाठी परिसरातील बिरसी, झिलमिली, कामठा, खातिया, परसवाड येथील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी तसेच बिरसी १0६ कुटुंबांची घरे अधिग्रहीत करण्यता आली. तशा सुचना गावकर्‍यांना देऊन अधिग्रहीत झालेली घरे मोकळी करून देण्यास सांगण्यात आले. परंतु, विस्थापित होणार्‍या कुटुंबाना राहण्यासाठी इतरत्र जागा उपलब्ध नसल्याने त्यांनी ‘आधी पुनर्वसन, मग धरण’ असा पवित्रा संघर्ष समितीच्या माध्यमातून घेतला. पुनवर्सनाअभावी प्रकल्पाला गती मिळेनाशी झाली होती. मात्र आता विमानतळ प्रशासनाला आपला विस्तार करावयाचा असल्यामुळे विस्थापित होणार्‍या सर्व कुटुंबाचे पुर्नवसन करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच पुनर्वसनाच्या कामाला सुरूवात होणार आहे. यासाठी प्रकल्पाने बिरसीजवळील आपली स्वमालकीची ३२ एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेवर विस्थापित होणार्‍या सर्व कुटुंबांना बसविण्यात येणार आहे. यामध्ये १0१ कुटुंबांना २५00 व उर्वरित पाच कुटुंबियांना ४ हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट घरबांधणीसाठी उपलब्ध करून दिले जातील. प्रकल्प्रस्ताने त्यावर आपले घर बांधावयाचे आहे. त्यासाठी प्रती कुटुंब ५.५0 ते ७.५0 लाख रुपए घरबांधणीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. बिरसी प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न मार्गी लागणार असून लवकरच कर्मशिअल पॉईंट सुरू होण्याचा आशावादही सचिन खंगार यांनी व्यक्त केला.पुर्नवसनाच्या कामाला सुरूवात होणार असल्यामुळे बिरसीवासी यांनी विमानतळ प्रशासनाचे आभार मानले.