अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त

0
14

गडचिरोली,दि.१९:: जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवरील लोहखनीजाचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक केले जात असल्याच्या माहितीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी संजुदास राठोड यांनी वाहतूक करणारे तीन ट्रक जप्त करून कार्यवाही केली आहे.मात्र याप्रकरणात वनविभागाचे सर्वच वरिष्ठ अधिकारी मात्र माहिती देण्यास व कारवाई पुर्ण करण्यात टाळाटाळ करीत असल्याची चर्चा आहे.

गेली तीन वर्षापासून लॉयलड्स मेटल कंपनीच्या वतीने लोहखनीजाचे उत्खनन करुण चंद्रपुर जिल्ह्यातील घुग्गुस स्टील उद्योगाला पुरवठा केला जात आहे. शासनाने दिलेल्या लीज व्यतिरिक्त वनविभाग कार्यक्षेत्रतुन अवैध लोहखनीज उत्खनन व वाहतूक केली जात असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे (ता 11) गुरुवारी भामरागड वनविभागाचे एटापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरजागड लोहखनीज पहाडीवर जाऊन अवैध लोहखनीज उत्खनन करणारे दोन जेसीबी मशीन व MH 34 AB 8896,  MH 40  BG 3181 व MH 34 AB 8743 असे क्रमांक असलेली कंपनीची तीन ट्रक ताब्यात घेतले.

सदरचे तिन्ही ट्रकवर वनपरिक्षेत्र कार्यालय एटापल्लीच्या ताब्यात ठेवण्यात आली आहे. लॉयलड्स मेटल सारख्या मोठ्या कंपनी विरुद्ध कार्यवाही केली जात असल्याने राजकीय दबाव असून प्रकरणात निष्पक्ष कार्यवाही केली जाते की, मिटविले जाते अशी शंका नागरिकांमध्ये उपस्थित केली जात आहे.