बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन

0
29

वाशिम, दि. १९ : जिल्ह्यात पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेल्या वाहनांवर तात्काळ करावी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निवारण कक्षाची स्थापना केली आहे. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबुसिंग राठोड यांची या कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तरी बेशिस्त पार्किंग, तसेच पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी पार्क केलेली वाहने, रस्त्यावर सोडून गेलेली वाहने आढळल्यास नागरिकांनी निवारण कक्षाशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेल्पलाईन क्रमांक १०० वर फोन करून अथवा ८६०५८७८२५४ किंवा ८६०५११२६८५७ या व्हॉटस्अप क्रमांकावर तसेच [email protected] या ई-मेलवर नागरिक बेशिस्त पार्किंगविषयीची माहिती देवू शकतात. तसेच पोलीस निरीक्षक बाबुसिंग राठोड यांच्या ७२७६२२०१७५ या व्हॉटस्अप क्रमांकावरही याबाबतची माहिती देता येईल. नागरिकांनी पार्किंग झोन व्यतिरिक्त अन्य ठिकाणी आपली वाहने पार्क करू नयेत अथवा रस्त्यावर सोडून जावू नयेत, असे आवाहन जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले आहे.